शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी-विक्री संघ नफ्यात

By admin | Updated: May 29, 2015 23:45 IST

गुरुनाथ पेडणेकर यांचा दावा : आमच्यावरील आरोप बिनबुडाचे

सावंतवाडी : सावंतवाडी खरेदी-विक्री संघ २००७-०८ या कालावधीत १३ लाख रुपये तोट्यात होता. मात्र, मी चेअरमनपदी बसल्यावर सर्व संचालकांच्या सहभागाने हाच संघ सव्वाचार लाख फायद्यात आणला. आमच्यावर होणारे आरोप बिनबुडाचे असून तथ्यहीन असल्याचे खरेदी-विक्री संघाचे चेअरमन तथा आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी स्पष्ट केले. ते सावंतवाडीतील माजी खासदार नीलेश राणे यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, सभापती प्रमोद सावंत, रवींद्र म्हापसेकर, भाऊ सावंत, गजानन सावंत, रवी मडगावकर, आदी उपस्थित होते.सभापती पेडणेकर म्हणाले, सावंतवाडी खरेदी-विक्री संघाची स्थिती योग्य नाही, जादा खर्च होणे योग्य नाही, म्हणून मी चेअरमन या नात्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून प्रयत्न केले. पण, पालकमंत्र्यांच्या काही सहकाऱ्यांना बिनविरोध निवडणूक नको होती. त्यामुळे त्यांनी आपणास आठ जागांचा आग्रह धरला आणि आम्हाला सात जागा देत होते. सत्ताधारी पॅनेल म्हणून आम्ही कमी जागा घेणे योग्य नाही. त्यामुळेच निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आमची बाजू पडती नाही. ९५३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, चांगल्या कामाची पोचपावती मतदार देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. संघाची स्वत:ची तीन गोडावून असून, सहा धान्य दुकानेही आहेत. आम्ही जेव्हा २००६-०७ च्या सुमारास संघ ताब्यात घेतला, तेव्हा संघ १३ लाख २२ हजार ९२३ रुपये तोट्यात होता. आता २०१४-१५ मध्ये संघाची अर्थिक स्थिती मजबूत करण्यात आली असून, संघ चार लाख २३ हजार ६७० रुपये फायद्यात आला आहे. हे सर्व श्रेय सर्व संचालक मंडळाचे असून, आमच्यावर जो विश्वास टाकण्यात आला त्यातून चांगले काम करू शकलो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)१३०० क्विंटल भात सडतेयसभापती गुरू पेडणेकर म्हणाले, आमच्या भाताच्या गोडावूनमध्ये २०१३-१४ मध्ये भाताची उचल झाली नसल्याने १३०० क्विंटल भात सडून चालले आहे. संघाला कमिशनही देण्यात आले नाही, असा आरोपही यावेळी सभापती पेडणेकर यांनी केला.