शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भेकुर्लीतील जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु

By admin | Updated: June 8, 2014 01:13 IST

भेकुर्ली येथील चाळीस भूमिहीन कुटुंबांना घर बांधण्यासाठी व शेतीसाठी शासनाकडून जमीन मिळणार आहे. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी स्वत: भेकुर्लीला भेट

कसई दोडामार्ग : भेकुर्ली येथील चाळीस भूमिहीन कुटुंबांना घर बांधण्यासाठी व शेतीसाठी शासनाकडून जमीन मिळणार आहे. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी स्वत: भेकुर्लीला भेट देऊन जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे लाभार्थ्यांना सांगितले. घरांसाठी लाभार्थ्यांना तीन गुंठ्यांचे भूखंड, शाळा व अन्य नागरी सुविधांसाठी गावठाण निर्माण करण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक कुटुंबाला दोन एकर शेतजमीन देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठविला जाणार आहे. भूमिहिनांना घरांसाठी हक्काची जमीन मिळणार आहे. भेकुर्लीत शासकीय जमीन आहे. निडली व भेकुर्लीतील धनगर, दलित व इतर मागासवर्गीय ४० भूमिहीन कुटुंबांना शेती व घरांसाठी ही जागा मिळावी, यासाठी सरपंच प्रेमानंद देसाई यांनी प्रयत्न सुरू केले. जागा मिळविण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच या प्रस्तावासंबंधी सकारात्मकता दर्शविली. स्वत: लक्ष घालून तहसीलदारांना जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. शुक्रवारी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी भेकुर्लीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार बी.बी. जाधव, एकनाथ नाडकर्णी, जनार्दन गोरे, प्रभारी गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, भूमिअभिलेखचे अधीक्षक महेश गावकर, तालुका कृषी अधिकारी कांबळे, चौकुळ कुंभवडेचे सरपंच विजय गावडे, पोलीस उपनिरीक्षक पोवार व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी भेकुर्ली मंदिरात झालेल्या चर्चेदरम्यान तहसीलदार व भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी जमिनीची माहिती दिली. तसेच चाळीस कुटुंबांना देण्यात येणाऱ्या जमिनीचा आराखडा सादर केला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी, लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी दहा एकर क्षेत्र गावठाण म्हणून विकसित करणे शक्य आहे. जिल्हास्तरावरून त्याला मान्यता मिळू शकते. प्रत्येक कुटुंबाला तीन गुंठ्यांचे भूखंड देण्यात येतील. त्यासाठी सुमारे पाच हजार रुपये रक्कम शासनाकडे जमा करावी लागेल, असे सांगितले. तळकट रस्त्यासाठी निधी देणार जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी व कुंभवडे सरपंच विजय गावडे यांनी कुंभवडे व तळकट रस्त्यासाठी निधी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. ई. रवींद्रन यांनी रस्त्याच्या मोरी व गटारासाठी निधी दिला जाईल, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)