शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा विभाजनाची प्रक्रिया थंडावली

By admin | Updated: May 22, 2017 23:08 IST

जिल्हा विभाजनाची प्रक्रिया थंडावली

शोभना कांबळे । लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्याच्या विभाजनासाठी शासनाकडून दोन वर्षांपूर्वी अनुकूलता दर्शविण्यात आली होती. त्यानुषंगाने विविध मुद्द्यांच्या आधारे जिल्हा प्रशासनाकडून मंत्रालयाकडे माहितीही पाठवण्यात आली आहे. मात्र, आता दोन वर्षांचा काळ उलटला तरीही याबाबत कोणतीच हालचाल सुरू झाली नसल्याने जिल्हा विभाजनाची प्रक्रिया थंडावली की काय, असा सवाल होत आहे.शासन निर्णयानुसार जिल्हा विभाजनाचे निकष ठरवण्याकरिता महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुनर्रचना समितीची बैठक २६ जून २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी रत्नागिरी जिल्हा पुनर्रचनेबाबतचे विविध निकष निश्चित करून या निकषांना गुणांक द्यावेत, निकष ठरविताना प्रशासकीय गरज लक्षात घेऊन त्याअनुषंगाने प्राप्त मागणीची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना या समितीकडून करण्यात आल्या होत्या. कोकणातील ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर नवीन जिल्हा उदयाला आला आहे. पालघरबरोबरच महाराष्ट्रातील इतर नवनिर्मित जिल्ह्यांमध्ये प्रशासकीयदृष्ट्या आवश्यक असलेल्या मूलभूत सोयीसुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव दिसून येत आहे. यात निधीची कमतरता, विविध कार्यालयांकरिता इमारतींचा अभाव, पदांची कमतरता तसेच इतर प्रशासकीय गोष्टींची उणीव असल्याने कामकाजात अडचणी येत असल्याचे या समितीकडून निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्यामुळे नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यापूर्वीच विविध बाबींची माहिती संकलित करण्यासाठी राज्याच्या महसूल व वन विभागाकडून जिल्हास्तरावर माहिती मागवण्यात आली होती.नवीन जिल्ह्याचे मुख्यालय विकसित करताना आवश्यक असलेल्या प्रशासकीय, कार्यालयीन इमारती, कर्मचारी-अधिकारी यांची निवासस्थाने, वाहने, तालुके, गावांची संख्या, क्षेत्रफळ, जिल्हास्तरीय कार्यालयांची संख्या, आकृतिबंधानुसार आवश्यक असलेली एकूण पदे, जिल्हा मुख्यालयापासून सर्वांत दूरच्या तालुका तसेच गावाचे अंतर, जिल्हास्तरीय कार्यालयांमध्ये मागील दहा वर्षात जनतेकडून प्रतिवर्षी प्राप्त झालेल्या अर्जांची, तक्रारींची संख्या आदींबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती पाठविण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविल्यास दोन वर्षांचा कालावधी उलटला. मात्र, शासनाकडून जिल्हा विभाजनाबाबत कोणतीच हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होणार की नाही, असा सवाल केला जात आहे.मध्यवर्ती ठिकाणी मुख्यालय हवेराज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत किती व केव्हा नव्याने जिल्हे निर्माण करण्यात आले, या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या वर्षासह याबाबतची माहिती शासनाने मागविली होती. त्याचबरोबर सामान्य जनतेला सोयीसुविधा पुरविण्याकरिता सोयीस्कर होईल, अशा पद्धतीने नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात यावी, अशा पद्धतीच्या सूचना या समितीतर्फे करण्यात आल्या होत्या. या जिल्ह्याचे मुख्यालय नवनिर्मित जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असावे, असेही समितीने सुचविले आहे.