शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सी-वर्ल्डच्या जागेची प्रक्रिया सुरू

By admin | Updated: June 26, 2016 00:32 IST

आराखड्यानुसार मोजणी : वायंगणी-तोंडवळी येथील चिन्हांकित काम चार दिवसांत पूर्ण

मालवण : मालवण तालुक्यातील वायंगणी तोंडवळी प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्पाच्या बनविण्यात आलेल्या आराखड्यानुसार जागा मोजणी आणि चिन्हांकित करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. शासनाने नियुक्त केलेल्या हुबळी येथील व्हिजन सोल्युशन या संस्थेने शनिवारपासून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला असून, चार ते पाच दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती टीमप्रमुख वीरुपाक्ष मारडगी यांनी दिली आहे. दरम्यान, नव्या आराखड्यानुसार वायंगणी-तोंडवळी माळरानावर साकारल्याजाणाऱ्या सी-वर्ल्ड प्रकल्पाचा केंद्रबिंदू ३४१ एकर जागेत असणार आहे, तर कालावल खाडीकि नारी १८ एकर व वायंगणी तोंडवळी समुद्रकिनाऱ्यावर ३१ एकर अशी ३९० एकर जागेसह एकूण ४२२ एकर जागा सी-वर्ल्ड प्रकल्पासाठी आराखड्यानुसार मोजणी करून चिन्हांकित केली जाणार आहे. राज्य शासनाकडून गतिमान हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे येथील ‘सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क’ या संस्थेने बनविलेला ३४१ एकरचा आराखडा बनविला आहे. वायंगणी तोंडवळी प्रस्तावित ३४१ एकर जागेची पाहणी करण्यासाठी शासनाकडून चार सदस्यीय तज्ज्ञ टीम मालवणात दाखल झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने चिन्हांकित जागेवर ‘नीस’ दगड निश्चित केले जाणार आहेत. भाजपकडून पाहणी प्रकल्पाच्या चिन्हांकित करण्याच्या प्रक्रियेची भाजप मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पाहणी करीत माहिती घेतली. यावेळी भाजपकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. मोंडकर यांच्यासमवेत शहर अध्यक्ष बबलू राऊत, तालुका सरचिटणीस तथा हडी सरपंच महेश मांजरेकर, आदी उपस्थित होते. तज्ज्ञ टीमकडून आराखडा, प्रत्यक्ष मोजणी प्रक्रिया याबाबत माहिती जाणून घेण्यात आली.