शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

एकीच्या बळातून गावाला पुरस्काराचे फळ

By admin | Updated: September 3, 2015 23:20 IST

दापोलीतील शिवाजीनगर : संत तुकाराम वनग्राम स्पर्धेत राज्यस्तरावर दुसरा क्रमांक

शिवाजी गोरे-दापोली -जंगल तोडीमुळे ढासळलेले पर्यावरण संतुलन, जंगली प्राण्यांचे मानवी वस्तीवरील आक्रमण व जंगली प्राणी नामशेष होण्याचे प्रकार केवळ जंगल तोडीमुळे होत आहेत. जंगल तोडीमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शासनाने गावागावात वन व्यवस्थापन समित्या स्थापन करुन वनव्यवस्थापन व वनांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. दापोली तालुक्यातील शिवाजीनगर या गावाने यामध्ये यश मिळवले आहे. लोकसहभागातून वनसंवर्धन व वन्यजीव रक्षण करुन उत्कृष्ट कामातून संत तुकाराम वनग्राम पुरस्कारापर्यंत मजल मारल्याने शिवाजीनगर गावाला एकीचे फळ मिळाले आहे. शिवाजीनगर गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने लोकसहभागातून गावाच्या महसूली हद्दीतील जंगलाची संरक्षण मोहीम हाती घेतली आहे. दापोली शहरापासून जवळच असणाऱ्या या गावाला वाढत्या शहरीकरणाचा फटका बसू नये, नैसर्गिक जंगल नष्ट होऊन गावात सिमेंटचे जंगल निर्माण होऊ नये, यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने जमीन विकण्यावर बंदी ठराव करुन घेतला आहे. गावात चरई बंदी, कुऱ्हाडबंदी, शिकार बंदीचा ठराव बहुमताने ग्रामसभेत मंजूर करुन त्याचे पालनही काटेकोरपणे केले जात आहे. शिवाजीनगर संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे ८६.५५ हेक्टर वनक्षेत्र आहे. २०१३-२०१४मध्ये नैसर्गिक पुन:निर्मिती अंतर्गत २५ हेक्टर क्षेत्रावर रोपवन उभारण्यात आले आहे. केवळ रोप उभारून ही समिती एवढ्यावर थांबली नाही, तर रोपवन जगवण्याची जबाबदारीही स्वीकारली. त्यातून २५ टक्के रोपवन जगवून वृक्ष संवर्धनाच्या मार्गावर वाटचाल सुरु ठेवली आहे. पावसाच्या पाण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ संकल्पना राबवून मृद आणि जलसंधारणाची कामे ग्रामस्थ लोकसहभागातून करीत आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असला तरीही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे पडणारे पाणी समुद्राला जाऊन मिळते. परंतु, या गावाने पडणाऱ्या पावसाचे योग्य नियोजन केले आहे. ग्रामस्थांनी श्रमदानातून मृद आणि जलसंधारणाची कामे केली आहेत. जंगलातून वाहणारे ओहोळ, नाले यावर दगड - मातीचे बांध घातले आहेत. त्यामुळे पाणीसाठा होेऊन मातीची धूप थांबली आहे. पावसाचे पाणी डोंगराळ व अतिउतार भागातील वाहून जाऊ नये, यासाठी दगडी बांध व चर मारुन जमिनीत पाणी जिरविण्याचे काम करण्यात आले आहे.गावातील लोकांना वनांचे महत्व कळावे, त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण व्हावी, म्हणून संयुक्त वनव्यवस्थापन समिती गावातील ग्रामसभेत वृक्ष लागवडीचे महत्व, वनांचे व वन्यजीव प्राण्याचे मानवी जीवनात असलेले महत्व पटवून देऊन प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण, पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवडीचे धडे देऊन शाळेतील भिंतीवर सुविचार लिहायला लावले जात आहे. शाळेतील वर्गखोल्यातील भिंतीवर अनेक प्रकारचे वृक्ष संवर्धन, पर्यावरणाचे चित्र रंगवून संदेश दिला जात आहे. पर्यावरण वाचवा, वाद्य वाचवा, जंगल तोड करु नका असे फलक विद्यार्थ्यांच्या हातात देऊन शाळेतील शिक्षकांनी गावातून प्रभातफेरी काढली. या माध्यमातून वन संवर्धनाचा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यात आला. लोकसहभागातून गावातील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, वृक्ष लागवड, सांडपाण्याचे नियोजन तसेच पावसाचे पडणारे पाणी अडवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच गावातील व शिवारातील विहिरी लोखंडी जाळीने बंदिस्त करण्यात आल्या आहेत. बंदिस्त विहिरींमुळे वन्य प्राण्यांच्या जीवाचा धोका नष्ट झाला आहे. तसेच पाळीव प्राण्यांच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणूनच या गावाने राज्यात दुसरा क्रमांक मिळवून जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिला आहे.शिवाजीनगर गावाने लोकसहभागातून वनसंवर्धन शक्य करुन दाखविले आहे. वनांचे संवर्धन व जतन ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक व्यक्तीने यासाठी पुढाकार घेतला तर वन व्यवस्थापनाचे अनेक फायदे असू शकतात, याचा प्रत्यय शिवाजीनगर गावाला आला आहे. गावातील रोपवाटिका, वृक्ष लागवड, वन्य प्राण्यांचे रक्षण, वृक्षतोड बंदी करुन या गावाने श्रमदानातून वन्यजीव प्राण्यांसाठी पाणवटे निर्माण करुन जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न खूप वाखाणण्याजोगे आहेत. आमच्या गावाने लोकसहभागातून केलेल्या उत्कृष्ट कामाच्या जोरावर राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंत मजल मारली आहे. - संजय महाडिक, अध्यक्ष -वन व्यवस्थापन समिती, शिवाजीनगर वनांचे जतन आणि वनसंवर्धन धोरण शासनाने ठरवून दिले आहे. वर्षागणिक उष्णतेचे तीव्र चटके बसत असल्याने वनक्षेत्र असलेल्या प्रत्येक गावात वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वनसंवर्धन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे. दापोलीच्या शिवाजीनगर गावाने लोकसहभागातून केलेली कामे उत्कृष्ट आहेत. त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर या गावाला २०१३-१४चा संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत राज्यातील दुसरे बक्षीस जाहीर झाले आहे. शासनाचे हे बक्षीस संपूर्ण गावाने एकीच्या माध्यमातून केलेल्या चांगल्या कामाचे फळ आहे. केवळ लोकसहभागामुळे हे शक्य झाले आहे. - राजेंद्र पत्की, वनपरिक्षेत्र अधिकारी, दापोली मोफत गॅस वाटप कलम रोपांचे वाटप करण्यात आले. वन विभागाच्या योजना या गावात राबवण्यात आल्या आहेत. संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या कामात सतत सुधारणा व्हावी, समित्यामध्ये चुरस निर्माण होऊन त्यातून शाश्वत वन व्यवस्थापनावर आधारित वनसंरक्षण आणि वनसंगोपनाद्वारे गावाचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून संत तुकाराम वनग्राम योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये सहभागी गावांना बक्षीस देऊन गौरविण्यात येते. सन २०१३-१४ या वर्षीचा राज्यस्तरीय दुसरा क्रमांक पटकावून शिवाजीनगर गावाने पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.