शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जनसंपर्कासाठी खासगी एजन्सी

By admin | Updated: July 16, 2014 00:25 IST

नीतेश राणे : कणकवली नगरपंचायतीच्या कामकाजाचा आढावा

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्यावतीने करण्यात येणाऱ्या विकासकामांबाबत जनतेला माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबरोबरच खासगी एजन्सी नेमण्यात येईल. तसेच शहरातील तरुणांच्या संख्येचा विचार करता शहरात ‘वायफाय’ सेवा सुरु करण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न आहे. आगामी कालावधीत नगरपंचायतीचे काम प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनसंपर्क वाढविण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांनी दिली.कणकवली नगरपंचायतीला मंगळवारी नीतेश राणे यांनी भेट देऊन विकासकामांबाबत आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, नगरसेवक किशोर राणे, मेघा गांगण, कन्हैय्या पारकर, रुपेश नार्वेकर, बंडू हर्णे, अभिजीत मुसळे, अण्णा कोदे, प्रा. दिवाकर मुरकर, माधुरी गायकवाड, माया सांब्रेकर, सुविधा साटम, सुमेधा अंधारी, गौतम खुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप मेस्त्री, अभय राणे, संजय मालंडकर आदी उपस्थित होते.यावेळी नीतेश राणे म्हणाले, नगरपंचायतीचे काम लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याबाबत नगरसेवकांशी चर्चा केली. नगरपंचायतीचे काम अधिकाधिक सक्षम बनविण्याचा प्रयत्न आहे. साफसफाईचे काम शहरात सुरु असून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नगरपंचायतीचे प्रयत्न सुरु आहेत. गतवर्षी नगरपंचायतीला भेट दिल्यानंतर जनता दरबार घेण्याच्या सूचना नगरसेवकांना दिल्या होत्या. त्यानंतर एकदा जनता दरबार झाला. तर दोनवेळा प्रभागनिहाय बैठकाही घेण्यात आल्या. मात्र, त्यानंतर आचारसंहिता असल्याने जनता दरबार होऊ शकला नाही. नगरपंचायतीच्या माध्यमातून जनतेची कामे करण्यास आम्ही कमी पडलो असे वाटत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु जास्तीत जास्त लोकाभिमुख काम करण्याचा आगामी काळात नगरपंचायतीचा प्रयत्न राहणार आहे. आचरा रस्त्यावर तुंबणाऱ्या पाण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येईल, असेही राणे यांनी सांगितले. (वार्ताहर)