शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नौदल भरतीत प्राधान्य द्या

By admin | Updated: July 19, 2016 00:26 IST

मच्छिमारांची मागणी : अधिकाऱ्यांच्या असहकार्याविषयी नाराजी

वेंगुर्ले : नवीन नौकांना व्हीआरसी, बायोमेट्रिक कार्ड, मासेमारी परवाने द्यावे व नौदल विभागातील नोकर भरतीमध्ये मच्छिमार समाजातील तरुणांना प्राधान्य द्यावे, आदी मागण्या सागरी सुरक्षा रक्षक, मच्छिमार संस्था, प्रतिनिधी, क्रियाशील मच्छिमार व नौकाधारकांच्या बैठकीत करण्यात आली.ही बैठक भारतीय तटरक्षक व्यवस्थापन समिती रत्नागिरीचे कोस्ट गार्ड अधिकारी दिनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ले पोलिस ठाण्यात झाली. यावेळी विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीत दिनेश कुमार यांनी अनोळखी जहाज दिसल्यास, नौकेवरील यंत्रणेचा वापर, जीवरक्षक साधनांचा वापर, आवश्यक संपर्क यंत्रणा, संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळून आल्यास आवश्यक खबरदारी घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मासेमारी सुरू झाल्यानंतर परप्रांतीय पर्ससीन ट्रॉलर्स येथे येऊन धुमाकूळ घालतात. बऱ्याचवेळा त्यांच्याकडे परवानेही नसतात. अशा नौकांवर कारवाई करण्यास मत्स्य व्यवसाय विभागाकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने त्यांना रोखता का येत नाही. याबाबत विचार व्हावा. नवीन नौकांना वर्ष-दोन वर्षे व्हीआरसी मिळत नाही. अत्यावश्यक असलेले बायोमेट्रिक कार्डही मिळत नाही, मासेमारी परवाने वेळेवर मिळत नाहीत, यासंदर्भात एकत्रित चर्चा करण्यासाठी पोलिस विभाग, मत्स्यविभाग व मच्छिमार यांची बैठक २५ जुलैपूर्वी घेण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी ही बैठक लवकरात लवकर घेऊन योग्य तो मार्ग काढू, असे पोलिस निरीक्षक आबाळे यांनी सांगितले. या बैठकीला मच्छिमार नेते वसंत तांडेल, मच्छिमार बाबी रेडकर, सुहास तोरसकर, मोहन सागवेकर, अनंत केळुसकर, संतोष तांडेल, गजानन कुबल, आदी ८० मच्छिमार उपस्थित होते. (वार्ताहर)आवाजाचे गूढ कायमच.... एप्रिल महिन्यात ८, १६ व १४ या तारखांना वेंगुर्ले किनारपट्टीवर तीन वेळा स्फोट सदृश आवाज आले होते. तटरक्षक प्रवीण सैदाणे, उत्तम नाविक, मनोज थापा यांच्याशी संपर्क साधल्यानंतरही योग्य सहकार्य मिळत नाही. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पाहणी केली तरी अद्यापपर्यंत निदान झाले नाही. मच्छिमारांच्या या प्रश्नाला यावेळीही बगल देण्यात आली.