शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत जुगार अड्ड्यावर छापा

By admin | Updated: December 23, 2016 23:02 IST

अकराजण ताब्यात : शहरातील बड्या व्यक्तींचा समावेश; २१ हजारांच्या रोकडसह चार दुचाकी जप्त

सावंतवाडी : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका हॉटेलची खोली भाड्याने घेऊन तेथे सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस यांच्यासह सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकून अकराजणांना ताब्यात घेतले. यामध्ये शहरातील बड्या व्यक्तींचा समावेश आहे. पोलिसांनी २१ हजार ४५७ रुपयांच्या रोकडसह ५५ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका हॉटेलमध्ये रूम भाड्याने घेऊन तीनपत्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी दुपारी १च्या सुमारास हॉटेलच्या सभोवताली नाकाबंदी केली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस यांच्यासह पोलिस निरीक्षक शंकर पाटील, उपनिरीक्षक जयदीप कळेकर, सचिन गिरीगोसावी, कॉन्स्टेबल अमोद सरंगले व विकी गवस यांनी हॉटेलच्या आतमध्ये प्रवेश केला. यावेळी हॉटेलच्या रूम नं. १०१ मध्ये तीन पत्ती जुगार सुरू होता.या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ताब्यात घेतलेल्यांमध्ये भानुदास नारायण सावंत (वय ६४ रा. परबवाडी, कुणकेरी-सावंतवाडी), पुंडलिक यशवंत सावंत (६३ रा. खालचीवाडी-ओवळिये), अरुण नागेश म्हापसेकर (५४ रा. वैश्यवाडा-सावंतवाडी) राजेंद्र रामचंद्र डेगवेकर (४२, रा. सुतारवाडी-माडखोल), दिवाकर श्रीपाद सुकी (६२, रा. वैश्यवाडा-सावंतवाडी), सुरेश जयराम डिचोलकर (५१, रा. कासारवाडा-कोलगाव), दत्ताराम गणपत परब (३७, रा. बाहेरचावाडा-सावंतवाडी), भोजू शिवा भोई (४४, रा. ढोलकरवाडी-माणगाव), गुरुनाथ वासुदेव सावंत (६१, रा. खालचीवाडी-देवसू), प्रताप जगन्नाथ चिपळुणकर (६२, रा. भटवाडी-ओटवणे), धीरज प्रकाश सुकी (३७, रा. वैश्यवाडा-सावंतवाडी) यांचा समावेश आहे. हा तीन पत्ती जुगार सकाळपासूनच सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. संशयितांवर कारवाईची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जयदीप कळेकर करीत आहेत. (प्रतिनिधी)