शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांकडून बंधाऱ्यांचे कौतुक

By admin | Updated: January 19, 2016 23:41 IST

लोकसहभाग : कृषी विकास अधिकाऱ्यांच्या पाठीवर थाप

रहिम दलाल --रत्नागिरी लोकसहभाग व श्रमदानातून जिल्ह्यात मिशन बंधारे मोहीम राबवण्यात आली. या यशस्वी योजनेची दखल जिल्हा दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. श्रमदानातून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे २४१ कोटी लीटर्स पाणी साठा करण्यात आला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १००० मिलिमीटर पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यात उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाई उद्भवणार असल्याचे चित्र समोर ठेवण्यात आले होते. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याच्या दृष्टिने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे २०१५-२०१६ हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे जिल्हा परिषद कृषी विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर कृषी अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन तालुकास्तरावर अधिकारी, कर्मचारी, सरपंच यांना बंधारे बांधण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे आदींमध्ये वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम सुरु करण्यात आले. जिल्ह्यात गावोगावी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पे्ररणा देशभ्रातर, उपाध्यक्ष सतीश शेवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू होते. साडेतीन महिन्यांच्या कालावधीत ४५७७ वनराई, विजय व कच्चे बंधारे बांधण्यात आले. त्यांची तालुकानिहाय संख्या पुढीप्रमाणे आहे.हे बंधारे बांधण्यासाठी खासगी कंपन्या, ठेकेदार, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींकडून आवश्यक असलेल्या साहित्याचा वापर करण्यात आला. बंधाऱ्यांमुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे वन्य प्राणी, पाळीव जनावरे, शेळ्या-मेंढ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले असताना चिपळूण येथील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी मिशन बंधारे २०१५-१६ च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामाची दखल घेतली व बंधारे उभारण्याच्या कामाची प्रशंसा केली. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील हजारो लोक उपस्थित होते.