शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

शासकीय यंत्रणेवर वृत्तपत्रांचा अजूनही दबाव

By admin | Updated: January 6, 2015 23:58 IST

राजीव साबडे : जिल्हा पत्रकार संघांच्या पुरस्कारांचे वितरण

कुडाळ : वृत्तपत्रांसमोर आज तंत्रज्ञानासह विविध प्रकारची आव्हाने आहेत. परंतु जोपर्यंत वाचकांचा विश्वास आहे, तोपर्यंत मराठी वृत्तपत्र सृष्टीला धोका नाही. वृत्तपत्र सृष्टीची उर्मी अजूनही टिकून असून शासकीय यंत्रणेवर वृत्तपत्रांचा अजूनही दबाव आहे, असे प्रतिपादन प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे सदस्य, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ व कुडाळ तालुका पत्रकार समिती यांच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, मुळदे सरपंच शशिकांत पालव, विकास कुडाळकर, रुपेश पावसकर, विनायक राणे, राकेश कांदे, सिद्धेश बांदेकर आदी उपस्थित होते. यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार दिलीप हिंदळेकर, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार रवी गावडे, युवा पत्रकार पुरस्कार गिरीश परब यांना, तर जिल्हास्तरीय छायाचित्र पुरस्कार अनिल भिसे यांना यावेळी प्रदान करण्यात आला. कुडाळ पत्रकार समितीच्यावतीने जाहीर झालेले व्याधकार पांडुरंग सहस्रबुध्दे, कै. वसंत दळवी ग्रामीण पत्रकार पुरस्कार नरेश बागवे, छायाचित्र पुरस्कार दत्ता देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर आमदार नीतेश राणे यांच्यासह उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पराग हळदणकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, सचिव गणेश जेठे, ज्येष्ठ पत्रकार वसंत केसरकर, संजीवनी देसाई, संतोष वायंगणकर, उपाध्यक्ष चंद्रकांत सामंत, सहाय्यक जिल्हा माहिती अधिकारी अर्चना माने, कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर आदी उपस्थित होते. आमदार नीतेश राणे म्हणाले, समाजातील चुकीच्या घटना खटकतात किंवा चांगल्या घटनेनंंतर प्रबोधन होईल, हे ज्याला समजते, तोच खरा पत्रकार. येथील पत्रकारांमध्ये असलेली एकजूट मुंबईतील पत्रकारांमध्ये दिसत नाही. इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वापरामुळे अमेरिकेतील वृत्तपत्रे बंद पडत आहेत. याबाबत वेळीच विचारमंथन होणे आवश्यक आहे, अशी राणेंनी व्यक्त केली. गजानन नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकमाच्या सुरुवातीला राज्यस्तरीय नृत्यांगना मृणाल सावंत हिने कथ्थक नृत्य सादर केले. प्रास्ताविक सचिव गणेश जेठे, मान्यवरांची ओळख अशोक करंबेळकर, सूत्रसंचालन नीलेश जोशी, आभार विजय पालकर यांनी मानले. (प्रतिनिधी)