शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोणतेही आव्हान स्वीकारण्याची तयारी

By admin | Updated: October 7, 2016 23:49 IST

संदेश पारकर : ‘शत प्रतिशत’ भाजप नारा सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करणार

कणकवली : सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा मी एक कार्यकर्ता आहे. माझी नाळ जनतेशी जुळलेली आहे. त्यामुळे माझा जनाधार कधीही संपणार नाही. विरोधकांनी माझ्या जनाधाराची काळजी करु नये. वेळ आल्यावर निश्चितच आमचा जनाधार दाखवून देवू. असे सांगतानाच भाजप पक्ष श्रेष्ठींनी टाकलेला विश्वास सार्थकी लावताना कोणतेही आव्हान स्वीकारण्याची तयारी ठेवलेली आहे. यापुढे सिंधुदुर्गात ‘शत प्रतिशत भाजप’ हा नारा सत्यात उतरविण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्याकडे लक्ष देणार असल्याचे कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी येथे स्पष्ट केले.मुंबई येथे भाजपत प्रवेश केल्यानंतर शुक्रवारी संदेश पारकर कणकवलीत दाखल झाले. येथील रेल्वे स्थानक तसेच भाजप संपर्क कार्यालयाजवळ त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप उपाध्यक्ष राजश्री धुमाळे, तालुकाध्यक्ष रवींद्र्र शेट्ये, बबलू सावंत, सुहास सावंत, बबली राणे,अमृत चौगुले आदी उपस्थित होते.संदेश पारकर म्हणाले, भाजपची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. सिंधुदुर्गात तिसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजप वाढविताना काँग्रेस पक्षच प्रमुख विरोधी पक्ष रहाणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसला भाजपाच्या माध्यमातून समर्थ पर्याय निर्माण केला जाईल.त्यामुळे राणे विरोधक म्हणून काम करण्याचा अथवा समोर कोण व्यक्ति विरोधक म्हणून आहे. याचा विचार करण्याची गरज वाटत नाही. त्यापेक्षा आमची लढाई जिंकण्यासाठीच असणार आहे.जिल्ह्यातील प्रत्येक गावात भाजप पक्षाचे सदस्य असावेत यादृष्टीने प्रयत्न केले जातील.तेथील कार्यकर्त्यांना ताकद देवून त्यांना खंबीरपणे उभे करण्यासाठी नियोजन करण्यात येईल. पूर्वी कोण कुठल्या पक्षात होते ? यापेक्षा आता सर्वच भाजपात आहेत हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे एकत्रितपणे विचार करून निर्णय घेतले जातील. गटातटाचे राजकारण होणार नाही. पक्ष श्रेष्ठींच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्षांसह जिल्ह्याचा दौरा करून संघटना बळकट करण्यात येईल. १0 आॅक्टोबर रोजी नगरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बांदा ते कासार्डे अशी रॅली काढण्यात येणार आहे. तसेच लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वेळ घेऊन त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात मेळावा घेण्यात येईल. यावेळी पक्षाचे अन्य नेतेही उपस्थित राहतील असे संदेश पारकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)युती सन्मानपूर्वक व्हावीप्रत्येक पक्ष आपल्यापरीने जिल्ह्यात पक्ष वाढविण्याचे काम करीत आहे. तसाच शिवसेना व भाजप ही करीत आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेत निर्विवाद वर्चस्व मिळवायचे असेल तर शिवसेना - भाजपा युती होणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत यामधील जिल्ह्यातील स्थितीबाबत भाजपच्या वरिष्ठांना अहवाल दिला जाईल. त्यानंतर ते जो निर्णय युतीबाबत घेतील तो आम्हाला मान्य असेल. परंतु युती झाली तर ती सन्मानपूर्वक व्हावी असे आपले मत असल्याचे एका प्रश्नाचे उत्तर देताना संदेश पारकर म्हणाले.आक्रमक व्हा !जनतेबरोबर आम्ही नेहमी राहणार आहोत. जनतेला मूलभुत सुविधा विनासायास मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न रहातील. त्यामुळे सिंधुदुगार्तील भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी आता आक्रमक व्हावे, असे आवाहन संदेश पारकर यांनी यावेळी केले.