शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

राजकीय पक्षांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी

By admin | Updated: August 18, 2014 23:32 IST

आंदोलनांचा फार्स

मिलिंद पारकर -कणकवली --विधानसभा निवडणुक जशी जवळ येत आहे तशी विरोधकांकडून रणनीतिचा भाग म्हणून छोट्या-मोठ्या आंदोलनांमधून लोकांच्या मनात उतरण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना, भाजपाकडून मॅरेथॉन आंदोलने करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनातून आश्वासनांची गाजरे दाखवण्यात आली. आंदोलनांचे हे सत्र काही कालावधी सुरू राहण्याची चिन्हे आहेत. बांधकाम विभाग, बीएसएनएल, वीज कंपनी, नगरपंचायत अशी टारगेट या आंदोलनांसाठी निवडण्यात येत आहेत. बीएसएनएलच्या बाबतीत गेले काही महिने अनेक तक्रारी निर्माण झाल्या आहेत. ठोस उपाययोजनाच होत नसल्याने आश्वासनांशिवाय काही केले जात नाही. बीएसएनएलला अधिकाऱ्यांना घेराओ घालून शिवसेनेच्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांनी जाब विचारल्याचे आंदोलन फार्स ठरला. अशाच प्रकारे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे नगरपंचायतीसाठी कायमस्वरूपी तंत्रज्ञ देण्याची मागणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून सावडाव धरणाकडे जाणारा रस्ता व तेथील संकुलाच्या बांधकामाबाबत आवाज उठवण्यात आला. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम आणि सार्वजनिक बांधकाम दोन्ही विभागांकडून नियमावर बोट ठेवण्यात आल्याने काहीच निष्पन्न झाले नाही. निकृष्ट काम आणि रस्त्यांशेजारी सुयोग्य गटारांचे बांधकाम नसल्याने शहरासह तालुक्यातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मात्र, हे खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद बांधकामकडे निधी नसल्याने खड्डे कसे बुजवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. गणेश चतुर्थीपूर्वी येनकेनप्रकारे खड्डे बुजवण्याची प्रथा आहे. शहरातील खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजवण्याचे आश्वासन नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत देण्यात आले. कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे यांच्या नावाची चर्चा नारायण राणे यांनी घडवून आणली. मात्र, कॉँग्रेसचेच आमदार विजय सावंत यांनी आपला दावा या मतदारसंघावर केला आहे. यावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस वगळता इतर पक्षांनी आपापली संघटना बांधणीची कामे हाती घेतल्याचे दिसत आहेत. पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करून संघटना बांधणीचे काम सुरू झाले आहे. आचरा मार्गाला बायपास होणाऱ्या मार्गासाठी कणकवली बसस्थानकानजीक टपाल खात्याकडील जमिन देण्यास सहमती झाली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याने आचरा बायपास मार्गाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कणकवली शहरात सुरू झालेल्या वाय-फाय सेवेचा बराच गाजावाजा झाला. वायफाय सेवेबद्दल युवकांच्या मनात मोठी उत्सुकता होती. मात्र, शहरात सर्वच ठिकाणी न मिळता शहरातील काही पॉकेटमध्ये ही सेवा मिळत आहे. साकेडीतील १४ जणांना तापसरी अतिसाराने गाठल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. वार्तापत्रकणकवली