शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ टोळीचे परजिल्ह्यांतही प्रताप

By admin | Updated: June 12, 2016 00:48 IST

अनेकांना गंडा : पावणेपाच लाखांचे दागिने जप्त

रत्नागिरी : दागिने घेण्याच्या बहाण्याने दुकानात शिरून चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांच्या पोलिस कोठडीत शनिवारी न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली. सातजणांच्या या टोळीतील तीन संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान या टोळीने रत्नागिरीसह सांगली, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही अनेक सराफांना गंडा घातला असल्याचे तपासात पुढे आले आहे. या चोऱ्यांमधील सुमारे ४ लाख ७३ हजार १६१ रुपयांचे दागिने जप्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. काही दिवसांपूर्वी मारुती मंदिर परिसरातील एका ज्वेलर्स दुकानासमोर चौघेजण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर पोलिसांनी ज्योत्स्ना कच्छवाह, सूरज कच्छवाह, कमल विनोद राठोड, संदीप राम जाधव या चौघांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे ५१ हजार रुपये रोख आणि दागिने आढळले होते. याबाबतच्या चौकशीत ते उडवाउडवीची उत्तरे देत होते, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि या चौघांना तत्काळ अटक करण्यात आली. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. ही सातजणांची टोळी गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरीत कार्यरत होती. अटक करण्यात आलेल्या ज्योत्स्ना कच्छवाह, सूरज कच्छवाह, संदीप जाधव व कमल राठोड यांचा समावेश आहे. रत्नागिरीसह लांजा, राजगड, पुणे, सांगली, गारगोटी, आजरा व निपाणी या ठिकाणी चोऱ्या केल्या असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यातील रत्नागिरी, लांजा, सांगली व गारगोटी येथे चार गुन्हे उघड झाले आहेत. या चोऱ्यांमधील सुमारे ४ लाख ७३ हजार १६१ रुपयांचे दागिने जप्त करण्यात यश आले आहे. पुढील तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पुणे येथे रवाना करण्यात येणार आहे. दरम्यान, शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.