शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्रभुगावकर, वळंजू, पालयेकर बिनविरोध

By admin | Updated: January 25, 2016 23:12 IST

सतीश सावंत यांची माहिती : जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापतीपदांची निवड

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २५ व्या अध्यक्षपदी संग्राम नारायण प्रभुगावकर यांची निवड झाली. महिला व बालविकास सभापतीपदी रत्नप्रभा वळंजू तर विषय समिती सभापतीपदी दिलीप रावराणे आणि आत्माराम पालयेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदाचा निर्णय येत्या दोन दिवसात काँग्रेस नेते नारायण राणे घेतील अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष, विषय समिती सभापतींच्या रिक्त झालेल्या पदांसाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. या सर्व पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने या निवडीसाठी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत ही बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर यांनी काम पाहिले. या निवडीनंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत, दीपलक्ष्मी पडते आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी अनेकांची नावे चर्चेत असल्यामुळे उत्सुकता ताणली होती. नव्या टिमची यादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी पक्षाच्या बैठकीत जाहीर करत लागलीच नामनिर्देशनपत्राचे सोपस्कार पूर्ण केले. त्यानंतर दुपारी जिल्हा परिषद सभेचे कामकाज पूर्ण केले. यावेळी विरोधी पक्षाचे राजन म्हापसेकर, जान्हवी सावंत व काँग्रेसचे सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर काँग्रेसमध्ये दाखल झालेले प्रकाश कवठणकर, निकिता जाधव, पंढरी राऊळ, समीर नाईक हे सदस्य सुरुवातीला अध्यक्षांसह सभापतीपदांसाठीच्या अर्ज भरणाऱ्यांची नावे जाहीर होईपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित होते. मात्र त्यानंतर हे सर्व जिल्हा परिषदेमधून निघून गेल्याने त्याच्यातील काही इच्छुकांना या पदांमध्ये सहभाग मिळाला नसल्याने ते नाराज होऊन गेले असल्याची चर्चा जिल्हा परिषद भवनात सुरु होती. मात्र याबाबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांना विचारले असता हे सर्व जण बैठकीस उपस्थित होते. मात्र त्यांची काही कामे असल्याने ते परवानगी घेऊन गेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) अखेर लॉटरी लागली : मांडलेले प्रश्न सोडवा संग्राम प्रभुगांवकर हे माजी राज्यमंत्री बापूसाहेब प्रभुगांवकर यांचे पुतणे होत. मसुरे येथील प्रभुगांवकर हे सरदार घराणे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून संग्राम प्रभुगांवकर यांनी सामाजिक कार्यात कामकाज सुरु केले. मसुरे पंचक्रोशीमध्ये विविध संस्थांवर त्यांनी काम केले. सन २००५ ते २०१० या कालावधीत ते मसुरे सरपंच म्हणून कार्यरत होते. २०१३ मध्ये प्रथमच ते काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. अध्यक्षपद हे खुल्या वर्गासाठी राखीव झाल्यावर गेली ३ वर्षे सातत्याने ते अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते.