शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांमध्ये परिवर्तनाची ताकद

By admin | Updated: April 2, 2017 22:28 IST

सतीश सावंत : मराठा समाज प्राथमिक शिक्षकांचा मेळावा, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

कणकवली : देशाचा भावी नागरिक घडविण्याचे बहुमूल्य कार्य शिक्षक करत असून, समाज परिवर्तन घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये असल्याने शिक्षकांनी संघटित व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सतीश सावंत यांनी केले. यावेळी त्यांनी आंब्रडसारख्या मतदारसंघात शिक्षक तसेच बँक अधिकाऱ्यांमुळे मी निवडून आलो असल्याचे सांगत, आपण सर्वांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्यास मराठा समाजाची उन्नती होईल, असे सांगितले. कणकवलीतील मराठा मंडळ सभागृहात शनिवारी झालेल्या मराठा समाजाच्या प्राथमिक शिक्षकांच्या मेळाव्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषद सदस्या सावी लोके, श्रिया सावंत, स्वरूपा विखाळे, संजय देसाई, तसेच व्ही. डब्लू. सावंत, दत्ता सामंत, पंचायत समिती सदस्य राधिका सावंत, महेश लाड, सुभाष सावंत, किसन दुखंडे, सेवानिवृत्त शिक्षक व मार्गदर्शक अशोक तळेकर, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.या मेळाव्याचे उद्घाटन सतीश सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. सतीश सावंत पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी जिल्हा बॅँकेमार्फत कर्ज योजना उपलब्ध आहे. यासाठी मुलांच्या पालकांच्या नावावर जमिनीचा सात-बारा असल्यास तो तारण न ठेवता दोन जामीनदार उपलब्ध केल्यास चार लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. तसेच चालू वर्षात बँकेकडून ६.५ लाख रुपयांचे कर्ज विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ९ टक्के दराने देण्यात आले आहे. तसेच एमपीएससी, युपीएससी परीक्षेकरिता पुस्तके, मार्गदर्शन वर्गासाठी केंद्र सुरू करण्याचा संचालक मंडळापुढे प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, आपल्या समाजाला आर्थिक सुलभता येण्यासाठी आपण संघटित होऊन कार्य करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी लागवडीखाली येण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्गदर्शन करावे. त्यामुळे मराठा व इतर समाजही प्रगतिपथावर जाईल. शिक्षकांनी समाजासाठी जास्तीत जास्त उपक्रम राबवावेत. त्यासाठी लागेल ते सहकार्य आम्ही करू. आपल्यावर अन्याय होत असल्यास जरूर आम्हाला हाक द्या. आपल्या समस्या सोडवून तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले. प्रास्ताविक किसन दुखंडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्याम सावंत यांनी केले. (वार्ताहर)पुढे जाणाऱ्याला प्रोत्साहन द्यामेळाव्याचे मार्गदर्शक सूर्यकांत तळेकर म्हणाले, शिक्षकांप्रती मला आत्मीयता आहे, परंतु मराठा समाजाची योग्यता असूनही केवळ आरक्षणांमुळे समाजातील व्यक्ती मागे पडत आहेत. त्यासाठी सर्वांनी मिळून आवाज उठविण्याची गरज आहे. एकमेकांचे पाय खेचण्याची वृत्ती कमी करून पुढे जाणाऱ्याला प्रोत्साहित केल्यास आपले समाज बांधवही उच्च पदावर कार्यरत राहतील, असे त्यांनी सांगितले.