शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांना एलईडी बल्ब

By admin | Updated: June 25, 2015 23:25 IST

महावितरण कंपनी : चार लाख सोळा हजार लोकांना लाभ

रत्नागिरी : विजेची बचत करता यावी यासाठी राज्यातील १ कोटी ७५ लाख घरगुती ग्राहकांना एलईडी बल्ब वाटप योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ४ लाख १६ हजार ८८६ घरगुती ग्राहकांना या एलईडी बल्बचा लाभ मिळणार आहे.एलईडी दिव्यांमुळे राज्याच्या १३ दशलक्ष युनिटस् वार्षिक विजेची बचत होणार आहे. कमाल मागणीच्या काळात ५०० मेगावॅट वीजेची मागणी कमी होण्यास मदत होईल. तसेच ग्राहकांची एका वर्षात प्रती बल्ब १८० रुपयांची वीजबिलामध्ये बचत होणार आहे. केंद्र सरकारने वीज बचतीसाठी घरगुती ग्राहकांना एलईडी दिवे वाटप योजना जाहीर केली आहे. या योजनेतील घरगुती ग्राहकांना प्रत्येकी ७ वॅट क्षमतेचे २ ते ४ बल्ब देण्यात येणार आहेत. हे बल्ब १०० रुपये रोखीने किंवा १०५ रुपये दराने मासिक योजनेच्या हप्त्याने घेता येतील. या योजनेमुळे बिलातून शून्य व्याजाने रक्कम वसूल केल्यामुळे ग्राहकांचा आर्थिक भार कमी होईल. शिवाय या योजनेचा विजेच्या दरावर किंंवा महावितरणवर कोणताही आर्थिक बोजा येणार नाही.तीन वर्षामध्ये मोफत बल्ब बदलण्याची गॅरंटी राहणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकाला एसएमएस, ईमेल किंवा प्रत्यक्ष कक्षावर भेटून बल्बची नोंदणी करावी लागेल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणचे शाखा कार्यालय, बिल भरणा केंद्र व इतर ठिकाणी बल्ब वाटप कक्ष उघडण्यात येणार आहे. ईईएसएल कंपनीतर्फे घरपोच सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या सहभागाने बल्ब वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)राज्याच्या १३ दशलक्ष युनिटस् वार्षिक वीजेची बचत होणार.कमाल मागणीच्या काळात ५०० मेगावॅट वीजेची मागणी कमी होण्यास मदत.ग्राहकांची एका वर्षात प्रती बल्ब १८० रुपयांची बचत.बल्ब १०० रुपये रोखीने किंवा मासिक योजनेच्या हप्त्याने घेता येणार.