शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली पालव यांचे पोतराज शिल्पकृती राष्ट्रीय कलाप्रदर्शनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 16:17 IST

केंद्र सरकारच्या ललित कला अकादमीतर्फे आयोजित मानाच्या राष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी शिल्पकार सोनाली प्रमोद पालव यांनी साकारलेल्या पोतराज या शिल्पकृतीची निवड झाली आहे. या प्रदर्शनात देशभरातून निवडक कलाकारांना त्यांच्यातील कलाविष्कार मांडण्याची संधी मिळते.

ठळक मुद्देपोतराज शिल्पकृती राष्ट्रीय कलाप्रदर्शनातशिल्पकार सोनाली पालव यांना कलाविष्कार मांडण्याची संधी

कणकवली : केंद्र सरकारच्या ललित कला अकादमीतर्फे आयोजित मानाच्या राष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी शिल्पकार सोनाली प्रमोद पालव यांनी साकारलेल्या पोतराज या शिल्पकृतीची निवड झाली आहे. या प्रदर्शनात देशभरातून निवडक कलाकारांना त्यांच्यातील कलाविष्कार मांडण्याची संधी मिळते.या प्रदर्शनासाठी देशभरातून सुमारे ३००० कलाकारांनी आपल्या कलाकृती पाठविलेल्या असून त्यातून २८३ कलाकृतींची परीक्षकांनी निवड केली आहे. नवी दिल्ली येथील  रवींद्र भवन कलादालनात या कलाकृती जगभरातील कलाप्रेमींसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहेत.लहानपणापासून उपजत कलागुण असणाऱ्या सोनाली यांनी सर जे. जे. स्कूल आॅफ आर्ट, मुंबई येथून कलेचे शिक्षण घेतले. त्यांनी तयार केलेल्या अनेक तैलचित्र आणि शिल्पांमधून त्यांची कला विविधांगी बहरत गेली. पुढे राज्यस्तरीय व युनिव्हर्सिटीच्या लहान-मोठ्या पुरस्कारांनी त्या नेहमीच कलाक्षेत्रात कार्यरत राहिल्या.२००९ व २०१० मध्ये मुंबई युनिव्हर्सिटीच्या आंतरमहाविद्यालयीन युथ फेस्टिव्हलमध्ये रांगोळी स्पर्धेतून सलग दोन वर्षे सुवर्णपदकांसह विजेत्या ठरल्या. २०१५ साली सर जे. जे. स्कूल आॅफ आर्टच्या पंडित दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार व पुढे संस्थेच्या बी. व्ही. तालीम पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.चित्रकला व शिल्पकला या माध्यमातून आपल्या देशाची संस्कृती व कला, परंपरा, इतिहास, जीवनशैली, सामाजिक जाणीव यांचा सुरेख संगम सोनाली यांच्या कलाकृतीतून पहायला मिळतो.पोतराज या शिल्पकृतीने प्रदर्शनाला भेट देणाऱ्या दिग्गज आणि कलारसिकांना आकर्षित केले आहे. सोनाली यांच्या कौतुकास्पद कार्याचा अनेक मान्यवरांकडून गौरव करण्यात येत आहे. या निवडीमुळे सोनाली यांच्या कलेचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान झाला आहे. 

टॅग्स :artकलाsindhudurgसिंधुदुर्ग