शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ं‘अंनिस’ फरार मारेकºयांची पोस्टर्स लावणार : सुशीला मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवैभववाडी : राज्य शासन दाभोलकर, पानसरे खुनाच्या तपासात अक्षम्य दिरंगाई करीत असल्याने विवेकवादी लोकांना धोका कायम आहे, असा आरोप करीत या प्रकरणातील संशयित फरार आरोपी सारंग अकोळकर व विनय पवार यांची ‘अंनिस’तर्फे राज्यभर पोस्टर्स लावली जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रधान सचिव सुशीला मुंडे यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कवैभववाडी : राज्य शासन दाभोलकर, पानसरे खुनाच्या तपासात अक्षम्य दिरंगाई करीत असल्याने विवेकवादी लोकांना धोका कायम आहे, असा आरोप करीत या प्रकरणातील संशयित फरार आरोपी सारंग अकोळकर व विनय पवार यांची ‘अंनिस’तर्फे राज्यभर पोस्टर्स लावली जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रधान सचिव सुशीला मुंडे यांनी वैभववाडी येथे पत्रकार परिषदेत दिली. विचारांचा लढा विचारांनी लढवा; त्यासाठी खून पाडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या संशयित मारेकºयांना पकडण्यात शासन दिरंगाई करीत आहे; त्यामुळेच पकडलेला संशयित आरोपी जामिनावर सुटला आहे. यासंबंधीचे प्रसिद्धीपत्रक देऊन मुंडे यांनी अंनिसची नेमकी भूमिका मांडली. यावेळी मच्छींद्रनाथ मुंडे, डॉ. शामकांत जाधव, किरण जाधव, प्रा. एस. एन. पाटील उपस्थित होते.सुशीला मुंडे पुढे म्हणाल्या की, डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला २० आॅगस्ट रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत, परंतु त्यांचे मारेकरी आजही मोकाट आहेत. ते वेळीच शोधून कारवाई केली असती तर कॉ. पानसरे व कर्नाटकातील प्रा. कलबुर्गी या दोन विवेकवादी व्यक्तींचा खून झालाच नसता, याची आम्हाला खात्री आहे. डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे खुनाच्या तपासातील दिरंगाईमुळे महाराष्ट्र पोलिसांचे हसे झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्ही वारंवार भेट घेतली. समितीने अनेक निवेदने दिली, परंतु संशयित आरोपींना पकडण्यासाठी राज्य किंवा केंद्र शासन पुरेसे प्रयत्न करताना दिसत नाही.कॉ. पानसरे खुनाच्या संथगती तपासाचा फायदा घेऊन या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडला जामीन मिळाला. त्यामुळे तोही फरार होण्याची किंवा साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने त्याच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात तातडीने अर्ज करायला हवा होता. तशी मागणीही अंनिसने मुख्यमंत्र्यांकडे केली होती, परंतु राज्य सरकारने त्याबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही. सनातन संस्थेचे साधक व खुनातील संशयित आरोपी सारंग अकोळकर व विनय पवार यांच्यापासून विवेकवादी लोकांना धोका असल्याने सीबीआयने त्यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे, परंतु राज्य सरकारने कॉ. पानसरे खूनप्रकरणी त्या दोघा संशयितांवर अद्याप बक्षीस जाहीर केलेले नाही किंवा त्यांना फरार घोषित करून त्यांच्या संपत्तीची जप्तीही केलेली नाही.