शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील १४ वर्षीय मुलगी पोचली वैभववाडीत

By admin | Updated: April 3, 2017 13:56 IST

तीन दिवसांपासून बेपत्ता, नवी मुंबई पोलिसात तक्रार

आॅनलाईन लोकमतवैभववाडी, दि. ३ : ऐरोलीतून(नवी मुंबई) बेपत्ता झालेली १४ वर्षीय मुलगी वैभववाडी पोलीस ठाण्यात पोहोचली. प्राजक्ता जितेंद्र तोरणे असे तिचे नाव आहे. ती कोकण कन्या एक्स्प्रेसने वैभववाडी स्थानकावर उतरली होती. तिची हालचाल संशयास्पद वाटल्याने एका वाहनचालकाने तिला पोलीस ठाण्यात आणून पोचविले. मानसिक स्थिती ठीक नसल्याने तिच्याजवळील मोबाईल क्रमांकामुळे नातेवाईकाशी संपर्क साधणे पोलीसांना शक्य झाले.याबाबत पोलिसांतंन मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून येणाऱ्या कोकण कन्या एक्स्प्रेसमधून ही मुलगी वैभववाडी स्थानकात उतरली. ती एकटी असल्याने स्थानकावरील लोकांना संशय आला. विचारपूस करताना तिच्याकडून नीट प्रतिसाद मिळत नसल्याने रेल्वे स्थानकावरील एका रिक्षा चालकाने तिला पोलीस ठाण्यात आणून सोडले. पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली. मात्र, ती नीट काहीच सांगत नव्हती. तिच्याकडे एक मोबाईल क्रमांक सापडला. त्यावर पोलीसांनी संपर्क साधला तेव्हा तो क्रमांक प्राजक्ताच्या वडीलांचा असल्याचे स्पष्ट झाले.प्राजक्ता तीन दिवसांपासून बेपत्ता असून नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलिसात त्याबाबत तक्रार दिली असल्याचे तिचे वडील जितेंद्र तोरणे यांनी सांगितले. प्राजक्ताचे नातेवाईक नवी मुंबईहून सकाळीच वैभववाडीला येण्यास निघाले असून ते आल्यावर प्राजक्ताला त्यांच्या ताब्यात देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.