शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दारिद्र्याला कंटाळून दाम्पत्याने बालकालाच विकले

By admin | Updated: April 25, 2015 01:10 IST

मळेवाड येथील घटना : पाच हजाराला गोव्यात विक्री; पोलिसांकडून चौकशी, तक्रार नाही

सुभाष परूळेकर / मळेवाड पदरी अठराविश्व दारिद्र्य, कुणाकडे तरी मोलमजुरी करायची आणि दोन वेळची पोटाची खळगी भरायची; पण आपणालाच मिळत नाही, तेथे मुलाला कोठून घालायचे, अशा विवंचनेत असलेल्या मळेवाड - जांभळीचे भरड येथे भाड्याने राहणाऱ्या एका दाम्पत्याने आपल्या चार महिन्यांच्या बालकालाच चक्क गोव्यात विकले. पहिल्यांदा मूल चोरीला गेल्याचा बनाव करणाऱ्या या दाम्पत्याला ग्रामस्थांनी हिसका दाखवताच, होय, मी मुलाला पाच हजार रुपयांना विकल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार दाखल झाली नव्हती. आरोंदा दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी झापू पवार यांनी या दाम्पत्याची चौकशी केली. मूळचे बांदा-देऊळवाडी येथील खेमराज व गीता सावंत हे दाम्पत्य काही महिन्यांपूर्वीच मळेवाड सीमेवरील जांभळीचे भरड येथे राहण्यासाठी आले. तेथीलच एका ग्रामस्थाच्या पडवीत त्यांनी संसार थाटला. सकाळी कुणाच्या तरी कामावर जायचे आणि संध्याकाळी यायचे. कोणी पैसे दिले तर जेवण, अन्यथा रात्र तशीच काढायची, असा त्यांचा दिनक्रम होता. या दाम्पत्याने २२ डिसेंबर २०१४ रोजी अपत्याला जन्म दिला होता. चार महिने हे अपत्य त्यांच्यासोबत आहे. कुठेही कामाला जाताना त्याला पोटाशी गुंडाळून आई काम करीत असे. हळूहळू या दाम्पत्याला त्याला खायला घालायचे ओझे होऊ लागले. अनेक वेळा या मुलाला विकण्याचा घाट या दाम्पत्याने घातला होता; पण त्यांना यश येत नव्हते. अखेर या मुलाच्या पित्याने गुरुवारी रात्री बनाव रचला. माझ्या मुलाला कोणीतरी उचलून नेले, असे ओरडून तो सांगत होता. काहीसे वेडसर स्वभावाच्या या दाम्पत्याच्या ओरडण्याकडे ग्रामस्थांनी प्रथम दुर्लक्ष केले. परंतु, शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिले असता त्यांचा मुलगा खरोखरच तेथे नसल्याचे दिसून आले. मूल हरवल्याचे कोणतेही दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर नव्हते. दोघांनी सांगितलेल्या माहितीमध्येही विसंगती दिसल्याने ग्रामस्थांनी दोघांना फैलावर घेताच मुलाला विकल्याचे बेधडकपणे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती आरोंदा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल झापू पवार यांना दिली असता त्यांनी खेमराजची चौकशी केली; पण आपली तक्रार नाही, असे सांगितल्याने पोलीसही काही करू शकले नाहीत. याबाबत पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनीही आमच्याकडे तक्रार आली नसल्याचा दुजोरा दिला.