शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

पोस्ट, इडीसीद्वारे तब्बल २९ हजार मतदारांचे मतदान

By admin | Updated: October 8, 2014 23:03 IST

विधानसभा निवडणूक : महिला कर्मचाऱ्यांना ‘इडीसी’ची सोय

रत्नागिरी : येत्या १५ तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात २९ हजार ५४२ इतके संभाव्य मतदार पोस्टल तसेच निवडणूक कार्य प्रमाणपत्राद्वारे (इडीसी) मतदान करणार आहेत. यात २० हजार ३२५ मतदार पोस्टल मतदान करणार आहेत तर ६७८४ मतदार ‘इडीसी’द्वारे मतदान करणार आहेत. दापोली मतदारसंघात एकूण २६०४ पोस्टल मतदान तर १४९४ इडीसीव्दारे मतदान करणार आहेत. गुहागर मतदारसंघात एकूण २३६७ पोस्टल मतदान तर ३६७ इडीसी मतदान करणार आहेत. चिपळूण मतदारसंघात एकूण २७८३ पोस्टल मतदान तर ५३५ इडीसी मतदान करणार आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात एकूण १० हजार ९७७ पोस्टल मतदान तर ३ हजार ९३३ इडीसी मतदान करणार आहेत. राजापूर मतदार संघात एकूण १५९२ पोस्टल मतदान तर ४५५ इडीसी मतदान करणार आहेत. या मतदारांमध्ये केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी श्रेणी १ ते ४, सैनिक मतदार, क्षेत्रीय अधिकारी, श्रेत्रिय सहायक अधिकारी, वाहलचालक (राखीवसह), एस. टी. वाहनचालक, पोलिस कर्मचारी, बुथस्तरावरील अधिकारी, सूक्ष्म मतदान निरीक्षक, कार्यालयीन कर्मचारी आणि अन्य निवडणुकीसंबंधित अधिकारी यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पोस्टल मतदान आणि इडीसी मतदान करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यापैकी जिल्ह्यातील ४७२२ सैनिकी मतदारांना पोस्टल मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. या मतपत्रिका निवडणूक विभागाला या एक दोन दिवसात मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात एका मतदार संघातील मतदाराला दुसऱ्या मतदार संघात मतदान करताना ते पोस्टाद्वारे मतदान करावे लागणार आहे तर केंद्राबाहेर काम करणाऱ्या कर्मचारी मतदारांना इडीसी द्वारे मतदान करणे सुकर होणार आहे. तसेच इतर जिल्ह्यातील असलेल्या अधिकारी आणि कर्मचारीवर्गाची टपाली मतपत्रिका आणि इडीसी फॉर्मही संबंधित प्रांतांकडे पाठविण्यात आली आहे. या एकूण मतदारांमध्ये मतदान अधिकारी क्र. ३ म्हणून काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या राहत्या ठिकाणीच नियुक्ती देण्यात आल्याने त्यांना इडीसी मतदान करता येणार आहे. पोस्टाद्वारे तसेच इडीसीद्वारे मतदान करणाऱ्यांची यादी अजूनही निश्चित झालेली नाही. या दोन - तीन दिवसात ही यादी निश्चित होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)पोस्टाद्वारे तसेच इडीसीद्वारे मतदान करणारे संभाव्य मतदार मतदारसंघनिहायविधानसभा पोस्टलइडीसीदापोली२६०४१४९४गुहागर२३६७३६७चिपळूण२७८३५३५रत्नागिरी१०९७७३९३३राजापूर१५९२४५५