शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाची दिशा बदलली...

By admin | Updated: December 17, 2014 22:53 IST

अनेक बऱ्यावाईट घटना-घडामोडींचे साक्षीदार असलेले २०१४ हे वर्ष

अनेक बऱ्यावाईट घटना-घडामोडींचे साक्षीदार असलेले २०१४ हे  वर्ष काही दिवसांत काळाच्या पडद्याआड कायमचे लुप्त होईल. नव्या वर्षाच्या उदरात नक्की काय लपले आहे? याचा अंदाज बांधणे तर अशक्यच, परंतु तरीही नवा सूर्य आशेचे, उत्साहाचे किरण घेऊन येईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. प्रत्येक क्षेत्रात जे घडले त्याच्याकडे मागे वळून पाहताना काय घडायला हवे होते व ते का घडले नाही, याचा लेखाजोखा मांडण्याचा ‘लोकमत’चा हा प्रयत्न...!ेसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलण्याचे काम सरत्या वर्षाने केले. गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा आणि नारायण राणे यांचे असलेले राजकीय समीकरण बदलण्यासाठी हे वर्ष कारणीभूत ठरले. लोकसभा निवडणुकीत राणेंचे सुपूत्र माजी खासदार नीलेश राणे यांचा झालेला पराभव आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खुद्द नारायण राणेंचा पराभव झाल्याने मोठ्या राजकीय उलथापालथीने हे वर्ष गाजले. त्यातच राणेंचा पराभव होताना दुसरे सुपूत्र नीतेश राणे यांनी कणकवली मतदार संघातून पहिल्यांदाच विधानसभेत एंट्री केली. त्यामुळे ‘कही खुशी, कही गम’ अशी स्थिती बनली. यावर्षाच्या सुरूवातीलाच म्हणजे जानेवारीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी काँग्रेस आणि पर्यायाने नारायण राणे यांच्याविरोधात रान उठवायला सुरूवात केली होती. त्यातून आमने-सामनेची घटना कणकवलीत घडली. त्यात राडा झाला आणि यातूनच वैभव नाईक यांनी खऱ्या अर्थाने बाजी मारत लोकांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. विधानसभा निवडणुकीत राणेंचा पराभव करून ते जायंट किलर ठरले. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीन पैकी दोन आमदार निवडून आणत नारायण राणेंना शह देताना पुन्हा भगवी वातावरण निर्माण केले. तर भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोंदीनाही प्रचारात आणूनही प्रमोद जठार यांची जागा ते वाचवू शकले नाही. नीतेश राणे यांनी कणकवली मतदार संघात बाजी मारत राणेंची विधानसभेतील जागा भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सिंधुदुर्गातील राजकारणात गेल्या वर्षभरात अनेक बदल घडले. या सर्व बदलांमध्ये राणे फॅक्टर मागे पडून आता नव्याने केसरकर फॅक्टरचा उदय झाला आहे. राणेंना पराभवाचा धक्कालोकसभा निवडणुकीत पूत्र नीलेश राणे याचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत स्वत:च्या झालेल्या पराभवाचा मोठा धक्का माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना बसला.दीपक केसरकर बनले मंत्रीशिवसेनेने दीपक केसरकर यांना राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश देत सावंतवाडीतून आमदारकीसाठी तिकीट दिले. लोकसभेतील केलेल्या मदतीची परतफेड केली. केसरकर यांनी या संधीचा लाभ उठवत दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळविताना मोठे मताधिक्य मिळविले. त्यामुळे सेनेने त्यांना ग्रामविकास राज्यमंत्री बनविले.महेश सरनाईक