शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
2
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
3
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
4
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
5
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
6
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
7
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
9
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
10
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
11
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
12
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
13
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
14
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
15
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
16
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
17
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
18
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
19
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
20
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप

गुहागरमध्ये राजकीय चढाओढ

By admin | Updated: April 10, 2015 23:47 IST

२६पैकी २ बिनविरोध : अनेक ग्रामपंचायतीत तिरंगी लढत

गुहागर : तालुक्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक २६पैकी २ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे २४ ग्रामपंचायतींमध्ये येत्या २२ एप्रिलला निवडणूक होणार आहे. २६ सार्वत्रिक आणि ७ ठिकाणी पोटनिवडणुका होत असून, एकूण ४०८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी आज झालेल्या छाननीत ६ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. आता एकूण ४०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.तालुक्यातील जाहीर झालेल्या २६ ग्रामपंचायतींपैकी रानवी व काजुर्ली या ग्रामपंचायतींच्या ७ जागांसाठी ७ अर्ज दाखल झाले असून, एकही अर्ज अवैध न ठरल्याने या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. पोटनिवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींपैकीपाली, मढाळ आणि वेलदूर येथील प्रत्येकी एका जागेसाठी एक अर्ज आल्याने या जागा बिनविरोध झाल्या आहेत.यामधील आंबेरे खुर्द ३ जागा, पाचेरी आगर येथे १ जागा आणि वरवेली येथील एका जागेसाठी एक ही अर्ज न आल्याने या जागा रिक्त राहणार आहेत. सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या २४ ग्रामपंचायतींपैकी अडूर ग्रामपंचायतीच्या ११ जागांकरिता २२ अर्ज, काताळे ९ जागांकरिता १५ अर्ज, उमराठ ७ जागांकरिता १३ अर्ज, कुडली ९ जागांकरिता १८ अर्ज, शिवणे ७ जागांकरिता ६ अर्ज, , कोंडकारुळ ११ जागांकरिता २८ अर्ज, जामसूत ७ जागांकरिता १६ अर्ज, शीर ७ जागांकरिता १२ अर्ज, गोळेवाडी ७ जागांकरिता ११ अर्ज, पेवे ९ जागांकरिता १७ अर्ज, कोसबीवाडी ७ जागांकरिता ५ अर्ज, मुंढर ७ जागांकरिता १७ अर्ज, तळवली ९ जागांकरिता १७ अर्ज, निगुंडळ ७ जागांकरिता १६ अर्ज, साखरीबुद्रुक ७ जागांकरिता १७ अर्ज, मासू ७ जागांकरिता १७ अर्ज, पालपेणे ९ जागांकरिता १५ अर्ज, भातगाव ७ जागांकरिता ६ अर्ज, खामशेत ७ जागांकरिता १० अर्ज, पिंपर ७ जागांकरिता २३ अर्ज, वेळणेवर ११ जागांकरिता ३० अर्ज, नरवण ९ जागांकरिता १९ अर्ज, मळण ९ जागांकरिता १७ अर्ज, पडवे ११ जागांकरिता २० अर्ज दाखल झाले आहेत. गुहागरमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक असल्याने अर्ज मागे घेण्याची शक्यता फार कमी आहे. गुहागर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी व्यूहरचना तयार करण्यात आली असून, या तालुक्यात ठिकठिकाणी पक्षीय प्रभावात निवडणुका होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. जिह्यातील गुहागरकडे यानिमित्ताने विशेष लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)गुहागर तालुक्यात विविध ग्रामपंचायतींवर आता सत्तेचा कल स्पष्ट होणार बिनविरोध ग्रामपंचायतीचा पायंडा काही ठिकाणी यशस्वीगुहागरमध्ये तीन पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकात उतरल्यामुळे चूरस वाढली