शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘पोलिसमित्र’द्वारे चोऱ्यांना पायबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 21:29 IST

प्रवीण चिंचाळकर : व्यापारी व सुवर्णकारांची सावंतवाडीत बैठक

सावंतवाडी : पावसाळी हंगामात शहरात होणाऱ्या चोऱ्यांमुळे पोलिसमित्र संकल्पना राबवून शहरात घडणाऱ्या चोऱ्यांना पायबंद घालण्याचा प्रयोग यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता गस्त घालण्यासाठी पोलिसमित्रांकरिता पुढे यावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण चिंचाळकर यांनी केले आहे.सावंतवाडी व्यापारी व सुवर्णकार संघटना यांच्यावतीने येथील दैवज्ञ गणपती मंदिरात शहरात घडणाऱ्या चोऱ्यांसंदर्भात उपाययोजना व सूचनांविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शनपर बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलिस निरीक्षक शंकर पाटील, व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद चोडणकर, आनंद नेवगी, संजू शिरोडकर, आदी उपस्थित होते.यावेळी निरीक्षक पाटील म्हणाले, शहरात परप्रांतीय वस्तू विक्री, मजुरीसाठी येतात. अशा लोकांकडून चोरीसारख्या घटना घडतात. त्यामुळे पोलिस आता अशा लोकांची माहिती घेऊन त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहणार आहेत. सोसायटीधारक, घर, बंगला यामधील रहिवासी आपले घर बंद करून बाहेरगावी काही दिवसांसाठी जात असेल, तर त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना त्याची माहिती द्यावी. प्रत्येक सोसायटीच्या जिन्यावर पोलिस विभागातर्फे चोरी टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत माहितीपत्रके लावून जनजागृती केली जाणार आहे. प्रत्येक घर, दुकानमालकांनी आपल्या घराच्या दरवाजाचे कुलूप भक्कम व मजबूत बसविण्याची काळजी घ्यावी. बँका, पतसंस्था, दुकानदारांनी शक्यतो सीसीटीव्ही कॅमेरे लावून सुरक्षारक्षक ठेवावा. याशिवाय पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवेळी पोलिंसमित्र म्हणून रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत सहभाग घेतल्यास बऱ्याचअंशी चोऱ्यांना पायबंद बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी जगदीश मांजरेकर, राजू मसूरकर, संतोष चोडणकर, वल्लभ नेवगी, संजू शिरोडकर, सुमंगल कालेलकर, राजू पनवेलकर, निशू तोरसकर, आदींनी चर्चेत सहभाग घेतला. (वार्ताहर)सुवर्णकार बाजारपेठेत डायरी ठेवा : पोलिसांचे सहकार्याचे आवाहनसुवर्णकार बाजारपेठेत प्रत्येक दहा दुकानांसमोर डायरी ठेवल्यास त्याठिकाणी येऊन पोलिस आपली नोंद ठेवतील. याला सुवर्णकारांनी आपला पाठिंबा दिला. बाजार व गल्लीत व्यवसाय करण्यासाठी फिरणाऱ्या परप्रांतीयांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून, रात्रीच्यावेळी संशयित व्यक्ती मिळाल्यास पोलिस त्याला तत्काळ चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने चोऱ्या घडू नयेत, असा विश्वास चिंचाळकर यांनी व्यक्त केला.