शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी रोखली बैलगाडी शर्यत

By admin | Updated: April 20, 2017 00:06 IST

पोलिसांनी रोखली बैलगाडी शर्यत

वैभववाडी : वैभववाडीनजीक कोकिसरे नारकरवाडी येथे आयोजित केलेली विनाफटका बैलगाडी शर्यत पोलिसांनी अर्ध्यावर बंद पाडली. त्यामुळे प्रेक्षक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची उडाली. गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. साळुंखे यांनी दिल्यानंतर जमाव शांत झाला. राजेंद्र नारकर व हिराचंद मुरकर यांना गाडीत कोंबून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्या मागोमाग सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पोलिस निरीक्षकांचे दालन गाठले. त्यामुळे पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी होऊन काही काळ तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरा नारकर व मुरकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करून तत्काळ सोडले.कोकिसरे नारकरवाडी येथे श्री महालक्ष्मी मित्रमंडळातर्फे विनाफटका बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास या स्पर्धेला सुरुवात झाली. बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी सुमारे साडेतीन ते चार हजार शौकिनांची गर्दी झाली होती. शर्यतीत जिल्ह्यातील १७ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या.जवळपास ९ गाड्यांची दौड पार पडल्यानंतर साडेपाचच्या सुमारास साहाय्यक पोलिस निरीक्षक ए. एन. साळुंखे पथकासह शर्यतस्थळी दाखल झाले. त्यांनी आयोजक कोण? अशी विचारणा करीत राजेंद्र (बाळा) नारकर व हिराचंद (बाबय) मुरकर यांना पोलिसांच्या गाडीत कोंबले. त्यावेळी उपस्थित शौकिनांनी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यावेळी जयेंद्र रावराणे यांनी पोलिसांच्या गाडीतील दोघा आयोजकांना खाली उतरण्यास सांगून पोलिसांना जाब विचारला.शर्यतस्थळी पोचल्यापासून पोलिसांनी चित्रिकरण सुरू केले होते. त्यामुळे जे जे चित्रिकरणात दिसतील त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा साळुंखे यांनी दिल्यामुळे सारे शांत झाले. त्यानंतर नारकर, मुरकर यांना पुन्हा गाडीत घालून पोलिस ठाण्यात नेले. त्यामुळे बैलगाडी शर्यत बंद पडल्याने उपस्थित हजारो शौकिनांचा हिरमोड झाला. पोलिस गाडीच्या मागोमाग शिवसेनेचे जयेंद्र रावराणे, भाजपचे राजेंद्र राणे, काँग्रेसचे कणकवली उपसभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण, बंड्या मांजरेकर, रवी पाळेकर आदींनी सहाय्यक पोलिस निरीक्षक साळुंखे यांचे दालन गाठले.सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या दालनात असल्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यात आली आहे.