शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पोलिस कुटुंबियांची पाण्यासाठी धडपड

By admin | Updated: November 4, 2016 00:22 IST

मालवणातील समस्या : पोलिस-मुख्याधिकारी यांच्यात बाचाबाची, तहसीलदारांकडे मांडली कैफियत

 मालवण : पोलिस वसाहतीतील पाण्याची समस्या सोडविण्यात पालिकेचे लक्ष वेधूनही पालिका अपयशी ठरली आहे. याबाबत महिन्याच्या प्रदीर्घ अवधीनंतर पालिका प्रशासनाच्या विरोधात संतप्त बनलेल्या मालवण पोलिस व त्यांंच्या कुटुंबियांनी पुन्हा एकदा मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी पालिकेत धडक दिली. मात्र, आपल्याला निवडणुकीचे काम आहे, असे सांगून त्या तहसील कार्यालय येथे निघून गेल्या. त्यामुळे अधिकच आक्रमक बनलेल्या महिला पोलिस व कुटुंबियांनी पालिकेबाहेर ठिय्या मांडला. त्यांनतर पालिकेकडून ठोस भूमिका न आल्याने पोलिस कुटुंबियांनी तहसीलदार वीरधवल खाडे यांची भेट घेत महिनाभर पाणी नसल्याची कैफियत मांडली. यावेळी तहसीदार यांनी दोन दिवसांत पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तहसील कार्यालयात पोलिसांनी धडक दिल्यानंतर नेहमी शांत असलेल्या मुख्याधिकारी यांनी थेट पोलिसांकडे बोट दाखवत पालिका प्रशासनाची बाजू झटकण्याचा प्रयत्न केला. पोलिस वसाहतीला पालिकेकडून पाणीपुरवठा सुरु आहे. आम्हांला पाणीपुरवठा हे एकच काम नसून निवडणुकीची कामे आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा होत असतानाही पोलिसांच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत, असे वादग्रस्त विधान मुख्याधिकारी रंजना गगे यांनी तहसीलदारांसमोर केले. याबाबत पोलिसांनी नाराजी व्यक्त करत पालिकेकडून पुरवठा केले जाणारे पाणी मुख्याधिकारी यांनी पिऊन दाखवावे, असे आव्हान केले. पोलिसांची तहसीलदारांकडे कैफियत पोलिस वसाहतीत महिनाभर पाणीपुरवठा होत नसल्याने पोलिस कुटुंबियांचे मोठे हाल झाले आहेत. पालिकेकडून तात्पुरत्या स्वरुपात देण्यात येणारे पाणी गढूळ असल्याने ते पिण्यायोग्य नाही. याकडे पालिकेचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जात आहे. पोलिस वसाहतीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यास दिरंगाई करणाऱ्या पालिकेने तात्पुरते गढूळ पाणी देऊन पळवाट काढली आहे. वसाहतीत महिनाभर सुरु असलेला पाणीप्रश्न पालिकेकडून गांभिर्याने घेण्यात येत नसल्याचा आरोपही पोलिस कुटुंबियांनी केला. यावेळी तहसीलदार खाडे यांनी पोलिसांचे म्हणणे ऐकून घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. पोलिस कर्मचारी व कुटुंबियांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता तहसीलदार खाडे यांनी पोलिसांशी काहीकाळ चर्चा केली. संबंधितावर कारवाई का नाही? मालवण पोलिस वसाहतीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेच्या संकुलाच्या वीज मीटरवरून या वसाहतीला नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा होत होता. मात्र विहिरीवरून पाणी उपसा करणाऱ्या वीज पंपाचे बिल भरणा करण्याच्या प्रश्नावरून वीज वितरण व पालिका प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाल्याने गेले २५ दिवस वसाहतीतील ३० ते ३५ कुटुंबे पाणीटंचाईचा सामना करत आहेत. मुख्याधिकारी रंजना गगे यांनी दोन दिवसांत पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन देऊनही पाणी प्रश्न सुटला नाही. याबाबत पालिका प्रशासन सबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यास टाळाटाळ का करते, असाही सवाल उपस्थित करण्यात आला. (प्रतिनिधी) गृहराज्यमंत्री लक्ष देतील का? मालवण पोलिस वसाहतीत गेले २५ दिवस पाणीपुरवठा खंडित आहे. पालिकेला वारंवार सांगूनही हा प्रश्न सुटला नाही. पोलिसांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना निवेदनाद्वारे व्यथा मांडताना तत्काळ प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे याची दखल घेत केसरकर पोलिसांना घरे देण्यापेक्षा मुलभूत समस्या मार्गी लावतील काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. ४वसाहतीत पिण्याचे पाणी येत नसल्याने महिनाभर शांत बसलेला पोलिसांमधील ‘माणसा’चा उद्रेक झाला. पाणी पुरवठा सुरळीत न करता पर्यायी पाणी उपलब्ध करून पालिका आपली जबाबदारी झटकत आहे. हेच पाणी शहरात एक दिवस बंद ठेवले तरी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. तत्काळ पाणीपुरवठा केला जातो. मात्र पोलिस वसाहतीत लक्ष वेधूनही २५ दिवस पाणी येत नाही म्हणजे पोलिस माणसे नाहीत का ? अशा अनेक प्रश्नांची पोलिसांनी सरबत्ती गगे यांच्यावर केली. मात्र, या प्रश्नांना ठोस उत्तरे देऊ न शकल्याने तहसीलदार दालनातून मुख्याधिकारी गगे यांनी काढता पाय घेतला. पहिली आंघोळ पाण्याविना! पोलिस कुटुबियांचाही पारा यावेळी चांगलाच चढला होता. ऐन दिवाळीत उद्भवलेल्या पाण्याच्या समस्येवर पालिकेने तोडगा काढला नसल्याने दिवाळीची पहिली आंघोळ पाण्याविना करण्याची वेळही पोलिसांवर आली आहे. कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस व त्यांच्या कुटुंबियांच्या भावनांचा आदर केला जात नाही. पाणी प्रश्नाबाबत पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांनीही गगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन कट केला. त्यामुळे पोलिसांच्या समस्येवर पालिका प्रशासनाला वेळ नाही, अशी खंत पोलिसांनी व्यक्त केली. हा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेकडून अपेक्षित सहकार्य न मिळता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वसाहतीला गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने आवाज उठवून न्याय मिळत नसेल तर शुध्द पाणी पोलिसांनी प्यायचेच नाही का ? कायद्याने हात बांधले गेले असल्याने अन्याय सहन करावा लागत आहे, असे आरोप करण्यात आले.