शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोयनारचे विस्थापित अडचणीत

By admin | Updated: June 12, 2015 00:35 IST

धरणाचे काम बंद : २२९ घरे विस्थापित, दोन बैठका निष्फळ

खेड : तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत पोयनार धरणाचे काम सध्या बंद करण्यात आले आहे. तांत्रिक त्रुटीमुळे हे काम बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ३५ कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च करून हे काम करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप पुनर्वसनाचे काम सुरू झाले नसल्याने विस्थापित संकटात सापडले आहेत. प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपासाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन्ही बैठका निष्फळ ठरल्याने प्रकल्पग्रस्त आणि उपजिल्हाधिकारी यांच्यात मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे २२९ घरांचे विस्थापन अडचणीत आले आहे. दरम्यान, पोयनार धरणाचे काम सध्या बंद करण्यात आले असून, विविध अडचणींच्या पार्श्वभूमीवर या कामाला मुहूर्त मिळणार की नाही, याबाबत या धरणावर काम करणारे अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून या धरणग्रस्तांच्या मागण्यांवर विचार करावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. मार्च २०१५मध्ये उपजिल्हाधिकारी राऊत आणि ग्रामस्थांमध्ये बैठक पार पडली होती. यावेळी ग्रामस्थांच्या सोयीनुसारच भूखंड वाटप करण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरल्याने ही बैठक निष्फळ ठरली. यानंतर ७ जून २०१५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला प्रकल्पग्रस्तांनी हाच आग्रह कायम ठेवल्याने उपजिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना बैठक अर्धवट सोडावी लागली. दोन्ही बैठकांमध्ये भूखंड वाटपाबाबत ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली. पोयनार धरणाचे अभियंता खेडेकर यांनी ही माहिती दिली. मात्र, असे असले तरीही पुन्हा याबाबत २ दिवसातच बैठक घेणार असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या मते अधिकाऱ्यांच्या असहकार्यामुळेच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अडचणीत आले आहे, तर अधिकाऱ्यांच्या मते प्रकल्पग्रस्तांच्या असहकार्यामुळेच पुनर्वसन संघर्षमय अवस्थेत पोहोचले आहे. परस्परविरोधी आरोप - प्रत्यारोपांमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या जागा संपादित करण्यात आल्याने त्यांच्या सोयीनुसार भूखंडाचे वाटप होणे आवश्यक आहे. परंतु अधिकाऱ्यांनी ही बाब ताणून धरल्याने चर्चा निष्फळ ठरविली जात आहे. मात्र, अभियंत्यांनी प्रकल्पग्रस्तांना समजावून योग्य तो मार्ग काढला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. धरणातील ७० टक्के काम पूर्ण झाले. या धरणाचे काम सुरू होण्यापूर्वी निधी उपलब्ध झाला होता, अशी माहिती खेडेकर यांनी दिली. उर्वरित काम निधीअभावी अनेकवेळा बंद करण्यात आले होते. आता हे काम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम मंदावले होेते. पोयनार धरणामुळे पोयनार गावातील ९० घरे, फुरूस गावातील १०६ घरे आणि धामणी गावातील ३३ घरे विस्थापित होणार आहेत. २२९ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे. या सर्वांना भूखंडाचे वाटप करण्यात येणार आहे. याकरिता रत्नागिरी येथून कूळवहिवाट विभागाचे उपजिल्हाधिकारी राऊत आणि इतर अधिकाऱ्यांनी दोन वेळा पोयनार गावाला भेट दिली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी शासकीय नियमानुसार कारवाई सुरू केली असता ग्रामस्थांनी त्यास विरोध केला. आम्हाला हवे त्या प्रमाणात भूखंडाची मागणी ते करीत होते. यास अधिकाऱ्यांनी विरोध केला. तसे होणार नाही, असे सांगत सरकारी नियमानुसारच या भुखंडाचे वाटप होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)तांत्रिक त्रुटीमुळे काम बंद खेड तालुक्यातील लघुपाटबंधारे विभागांतर्गत अनेक वर्षे सुरू राहिले पोयनार धरणाचे काम.पस्तीस कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचे हे धरण अनेक कारणांनी गाजते आहे, कधी ठेकेदार, तर कधी शासन निर्णय, कधी निधीचा फटका. धरण विस्थापितांचे प्रश्न अद्याप कायम राहिल्याने शेतकऱ्यांना वरदान ठरणारे हे धरण कायम चर्चेतच.