शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कवी संमेलनात साहित्यप्रेमी भारावले

By admin | Updated: October 27, 2015 00:15 IST

कुडाळ येथील ‘गारवा’ कवी संमेलन : नवोदित कवींना रसिकांकडून उत्स्फूर्त दाद

कुडाळ : नवोदित कवींच्या ‘गारवा’ कवी संमेलनातील कवितांनी साहित्यप्रेमींना भारावून सोडले. सुमार तीन तासाहून अधिक काळ चाललेल्या या कवी संमेलनातील नवोदीत कवींच्या कवीतांना प्रेक्षकांसह साहीत्यीकांनीही भरभरून दाद दिली. कोमसापच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनात जिल्ह्यातील नवोदित कवी लेखक यांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत कवी संमेलन घेण्यात आले होते.नवोदित कवींसाठी या साहित्य संमेलनात ‘गारवा’ या कवी संमेलनाचे आयोजन केले होते. या कवीसंमेलनात मोठ्या प्रमाणात नवोदित कवींनी भाग घेतला. यामध्ये जिल्ह्यातील पे्रमलता सावंत भोसले, मधुरा आठलेकर, गोविंद पायनाईक, मृण्मयी बांदेक र, स्रेहा राणे, अनुराधा दीक्षित, सुनंदा कांबळे, प्रतिभा चव्हाण, कल्पना बांदेकर, माधुरी जोशी, गौरी सावंत बांदेकर, लॅक्सी फर्नांडिस, राज सेरगे, सुप्रिया मिराशी, अजिंक्य यादव, सतीश साळगावकर, सोनाली नाईक, बाजीराव काळे, अवधुत नाईक, बाजीराव काळे, अवधुत नाईक, महेश बावलेकर, अंजली मुतालिक, अनिल कांबळे, किशोर वालावलकर व इतर कवींनी आपल्या कविता सादर केल्या.या संपूर्ण साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन नीलेश जोशी यांनी केले. तर काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन साहीत्यीक प्रफुल्ल वालावलकर व हावळ यांनी केले. मुंबई येथे संपूर्ण कोकण विभागाच्या होणाऱ्या कोकण-मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसगे यांनी साहित्यिक व साहित्यप्रेमींना केले.(प्रतिनिधी)उत्साहात समारोप : रसिकांची मने जिंकलीनवकवींनी सादर केलेल्या कवितांमध्ये विविधता होती. नवरसामध्ये असलेल्या सामाजिक, राजकीय, काल्पनिक, शृंगारिक, वैचारिक अशा विविध विषयांवर केलेल्या कवितांच्या सादरीकरणामुळे साहित्यप्रेमी, श्रोते तृप्त झाले. सायंकाळी उशिरा कवी विष्णू सूर्या वाघ, शशिकांत तिरोडकर, रूजारिओ पिंटो तसेच इतर कवींनीही आपल्या कविता ‘साज’ या कवी संमेलनात सादर करून रसिकांची मने जिंकली.साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी उत्साहात समारोप करण्यात आला. यावेळी विष्णू सूर्या वाघ व महेश जावकर यांच्या हस्ते हे संमेलन पार पाडण्यासाठी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचा सत्कार करण्यात आला.