शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग ठेकेदाराचे गलथान नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:23 IST

सुधीर राणे। कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात रस्ते परिवर्तित ...

सुधीर राणे।कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात रस्ते परिवर्तित करण्यात येत आहेत. मात्र, या रस्त्यांबाबत वाहन चालकांना माहिती नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराचे गलथान नियोजन याला कारणीभूत असून एकप्रकारे संबंधित स्थिती अपघाताला आमंत्रणच ठरत आहे.या स्थितीतून आपली कधी सुटका होणार? असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे. कणकवली शहरात सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाच्या कामाने गती घेतली आहे. मात्र, काही प्रकल्पग्रस्तांची जमीन महामार्ग चौपदरीकरणात गेली असली तरी अजूनही त्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या इमारती तोडण्यास त्यांनी हरकत घेतली आहे. याचा परिणाम म्हणजे संबंधित ठिकाणी महामार्ग ठेकेदाराला काम करणे शक्य होत नाही.त्यामुळे एकूणच कामावर परिणाम झाला आहे. कणकवली शहरात उड्डाणपुलाच्या दुतर्फा सर्व्हिस रस्ता तयार करायचा आहे. त्यापैकी काही ठिकाणी सर्व्हिस रस्ता तयार झाला आहे. मात्र, कणकवली तेलीआळी डीपी रोडपासून हॉटेल मंजुनाथपर्यंत सर्व्हिस रस्ता करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या परिसरात ठिकठिकाणी परिवर्तित रस्ता तयार करून काम करावे लागत आहे.अशीच स्थिती नरडवे रोडजवळ महाडिक कंपाऊंड येथे आहे. परिवर्तित रस्ते तयार करताना ठेकेदाराकडून योग्य ते नियोजन केले जात नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी आज परिवर्तित मार्ग असेल तिथेच दुसºया दिवशी तो असेल याबाबत खात्री नसल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांचा गोंधळ उडत आहे. यातूनच अपघाताच्या घटना घडत आहेत.त्यामुळे या समस्येकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असून ठेकेदाराला या समस्येची जाणीव करून देणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित परिसरात अपघाताच्या घटना घडतच राहणार आहेत. अनेकवेळा वाहनांना ये-जा करण्यासाठी एकच परिवर्तित मार्ग असल्याने तसेच तो अरूंद असल्याने समोरासमोर वाहनांची धडक होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत.सर्व्हिस रस्त्याच्या बाजूने बनविण्यात येणाºया गटारांचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. गटारावरील स्लॅबही चांगल्या प्रतीचे साहित्य वापरून बनविले नसल्याने ते खचत आहेत. त्यामुळेही अपघात घडत आहेत.