शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सैनिक स्कूलचे चित्र लवकरच स्पष्ट

By admin | Updated: December 10, 2014 00:16 IST

सुधीर सावंत : माजी सैनिकांच्या अनेक तक्रारी; राजमातांना पाठिंबा जाहीर

सावंतवाडी : आंबोलीतील सैनिक स्कूलबाबत माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. मी या तक्रारीची खातरजमा करीत आहे. सरकारी मालमत्तेवर कर्ज घेतल्याबाबत धर्मादाय आयुक्तांकडून माहिती मागवली आहे. माहिती मिळाल्यानंतरच सैनिक स्कूलबाबत २० जानेवरीपर्यंत चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती माजी खासदार सुधीर सावंत यांनी दिली. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.माजी खासदार सुधीर सावंत यांनी राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. तसेच यापुढे नेहमी संस्थेच्या कामासाठी हाक मारताच मी येत जाईन, असेही माजी खासदार सावंत यांनी राजमातांना सांगितले.यावेळी शिक्षणमहर्षी आबासाहेब तोरस्कर, शिवाजी सावंत, संदीप कुडतरकर, सुरेश परब आदी उपस्थित होते. सावंत म्हणाले, सावंतवाडीतील शैक्षणिक संस्थेचे कार्य मोठे आहे. हे कार्य आम्ही कदापि विसरू शकणार नाही. त्यामुळेच माझा राजघराण्याला आणि विशेषत: संस्थेला पाठिंबा असून, चुकीच्या माणसाच्या हातात संस्था जाऊ नये, यासाठी सर्वांनीच जागरूक राहिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.पक्षाच्या विस्तारासाठी देशात फिरतो आहे. त्यामुुळे मी स्थापन केलेल्या संस्थेकडे बघण्यास वेळ नाही. पण, आता यापुढे प्रत्येकवेळी संस्थेच्या कामात लक्ष घालणार आहे. चुकीच्या लोकांकडे संस्था कशी जाणार नाही, हे बघेन, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सैनिक स्कूलबाबत माजी सैनिक तसेच आंबोलीतील ग्रामस्थांनी तक्रारी नोंदवल्या असून, मी या ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरच संस्थेच्या कर्ज प्रकरणाबाबत धर्मादाय आयुक्तांकडून माहिती मागविली आहे. ही माहिती लवकरच मला मिळेल, त्यानंतर ३० जानेवारीपर्यंत संस्थेचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती सुधीर सावंत यांनी दिलीे. याप्रकरणी सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. (प्रतिनिधी)