शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पर्ससीन अन् पारंपरिक मच्छीमार समुद्रात भिडणार?

By admin | Updated: May 9, 2017 23:45 IST

पर्ससीन अन् पारंपरिक मच्छीमार समुद्रात भिडणार?

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातील पर्ससीन नौकाधारक मच्छीमार व पारंपरिक मच्छीमार यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. बंदी आदेशानंतरही पर्ससीन नेट नौकांकडून समुद्रात मासेमारी सुरू असल्याने पारंपरिक मच्छीमार संतप्त झाले आहेत. समुद्रात मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौका मत्स्य व्यवसाय खात्याला दिसत नसल्याने पारंपरिक मच्छीमार अशा पर्ससीन नौकांना समुद्रातच रोखणार आहेत. तसा निर्णय घेण्यात आल्याने आता पारंपरिक मच्छीमार व पर्ससीन मच्छीमार समुद्रातच एकमेकांना भिडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १ जानेवारी ते ३१ जुलै या काळात पर्ससीन नेटने सागरी मासेमारी करण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. गेल्यावर्षी निर्णय झाल्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी गतवर्षी करण्यात आली होती. २०१७ च्या १ जानेवारीपासून पुन्हा पर्ससीन बंदीचा काळ सुरू झाला. परंतु पर्ससीन मासेमारीला बंदी होती, असे कधीच दिसून आले नाही. नेहमीच मत्स्य व्यवसाय खात्याच्या अधिकाऱ्यांनी पर्ससीन मासेमारीला बंदी काळातही अभय दिल्याचा आरोप करण्यात आला. पारंपरिक मच्छीमारांनी बंदी काळातील पर्ससीन मासेमारीचे प्रकार उघडकीस आणून दिल्यानंतरही त्यांच्यावर थातूरमातूर कारवाई करण्यात आल्याचा पारंपरिक मच्छीमारांचा आरोप आजही कायम आहे. याविरोधात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या माध्यमातून पारंपरिक मच्छीमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा याआधीच दिला होता. मात्र, पर्ससीनवर कडक कारवाईचे आश्वासन मिळाल्याने हा मोर्चा स्थगित करण्यात आला होता. जानेवारीपासून मे महिन्यापर्यंत पर्ससीन मासेमारी काही बंद झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पारंपरिक मच्छीमारांनी आता सचिव, मत्स्य व्यवसाय खाते, महाराष्ट्र तसेच आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आंदोलन तीव्र करीत असल्याचे निवेदन सोमवारी दिले आहे. पर्ससीन मासेमारी अद्याप बंद न झाल्याने पारंपरिक मच्छीमार आता ही लढाई समुद्रात लढणार आहेत. मत्स्य खात्याला पर्ससीन मासेमारी करणाऱ्या समुद्रात न दिसणाऱ्या नौकांना पारंपरिक मच्छीमार समुद्रात रोखणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाला हिंसात्मक वळण लागल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असेही समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे पर्ससीन व पारंपरिक मच्छीमारांमधील वाद विकोपाला गेल्याने प्रशासनाने या वादात वेळीच लक्ष घालण्याची व पर्ससीन मासेमारी बंदी काळात बंद ठेवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पारंपरिक व पर्ससीन मच्छीमार समुद्रातच भिडण्याची भीती निर्माण झाली आहे.