शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पर्ससीनचा धुमाकूळ सुरूच

By admin | Updated: September 26, 2015 00:14 IST

‘शैरानी’ची सुरु आहे दिवस-रात्र गस्त

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील पर्ससीन व परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सवर मत्स्य विभागाने कारवाई केली तरीही पर्ससीन मासेमारीचा धुमाकूळ सुरूच आहे. गुरुवारी रात्री ‘शैरानी’ गस्ती नौकेतील कारवाई पथकाने चार ट्रॉलर्स पकडत पर्ससीनवर तत्काळ कारवाईचे प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र, याबाबत सुनावणीची तारीख निश्चित करून दोन्ही बाजूची भूमिका व बाजू ऐकून घेवून कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, सलग तीन दिवस सार्वजनिक सुट्ट्या असल्याने कारवाई पुढे गेली आहे. यावेळी विनापरवाना पर्ससीन मिळूनही पुरेशा साधनसामुग्री अभावी व सुरक्षेची जोखीम पाहता मत्स्य विभागाने हे पर्ससीन ताब्यात घेण्याची तसदी घेतली नाही. मच्छिमारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर तहसीलदार, जिल्हाधिकारी व मत्स्य आयुक्त यंत्रणा सतर्क झाली आहे. प्राप्त आदेशानुसार पर्ससीनचे अतिक्रमण रोखण्यासाठी दिवसरात्र मत्स्य विभागाची गस्त सुरु आहे. गुरुवारी मत्स्य विभागाच्या ‘शैरानी’ गस्ती नौकेतील कारवाई पथकाने आठ पर्ससीन ट्रॉलर्सची तपासणी केली. यात सुधाकर मोंडकर (धनसागर), आरिफ दर्वे (सलमा खातू), विकास सावंत (हेरंब ) या तीन रत्नागिरी तर मालवणमधील रवींद्र रेवंडकर (चंद्रिका) या चार ट्रॉलर्सना पकडून कारवाई करण्याचे प्रस्ताव तहसील कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेच्या धडक कारवाईनंतरही समुद्रात राजरोसपणे मासळीची लुट सुरूच आहे. गुरुवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत चाललेल्या गस्ती मोहिमेत एकही ट्रॉलर पकडण्यात यश आले नव्हते. तर शैरानी शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा धडक मोहिमेसाठी पोलीस बंदोबस्तात पर्ससीन ट्रॉलर्सच्या मागावर निघाली आहे. (प्रतिनिधी)एमपीडीए कायदा लागू करण्याची मागणीमच्छिमारांसाठी १९८१ चा अधिनियम तयार करण्यात आला. विनापरवाना मच्छीमार आढळल्यास मासळीच्या पाच पट दंडाची अधिनियमात तरतूद आहे. कारवाई अल्प प्रमाणात होत असल्याने पर्ससीनचे प्रमाण वाढतच चालेले आहे. कारवाई टाळण्यासाठी मिळालेली मासळी गस्ती नौका पोहोचेपर्यंत समुद्रात फेकली जाते. पारंपरिक मच्छीमारांनी शासनाकडे पर्ससीन व हायस्पीड ट्रॉलर्सवर एमपीडीए कायदा लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे. परप्रांतिय आणि ट्रॉलर्सव्दारे चालणाऱ्या अनधिकृत मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमार हैराण झाले आहेत. त्यामुळे बंदोबस्ताची मागणी होत आहे.