शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

निशाण तलावातील लोकसहभागातून गाळ काढणार

By admin | Updated: May 29, 2016 00:18 IST

वेंगुर्लेवासीय एकत्र : ३0 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कामास प्रारंभ करणार

वेंगुर्ले : ब्रिटीश काळात वेंगुर्ले शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या निशाण तलावात पाण्याचा थेंब साठत नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या तलावाचे निकृष्ट बांधकाम केले. या मालमत्तेवर नगरपरिषदेकडून दुर्लक्ष झाल्याने उन्हाळी पाणी टंचाई झळ तीव्र झाली. त्यामुळे शनिवारी लोकसहभागातून या तलावाचा गाळ काढणे व परिसराची साफसफाई करण्यासाठी स्थानिक नागरिक एकवटले. यावेळी युवाशक्ती प्रतिष्ठान, नागरी कृती समिती व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहभागातून काम करण्याचा निर्णय विलास गावडे यांनी जाहीर केला. मात्र, या संंदर्भात प्रथम जिल्हाधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व चर्चा करुनच हे काम केले जाणार आहे. त्यानुसार ३0 मे रोजी अधिकाऱ्यांची भेट घेऊन या कामाची सुरुवात करण्याचा निर्णय जाहीर केला. वेंगुर्ले शहरात उन्हाळी पाणी टंचाईची तीव्रता वाढल्याने व शासनस्तरावर नागरी कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले यांनी निशाण तलाव व नारायण तलाव या महत्वाच्या जलस्तोत्राबाबत पाठपुरावा करुनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वेंंगुर्लेतील नागरिक लोकसहभागातून नारायण तलावाचा गाळ काढणे व स्वच्छता करण्यासाठी पुढे सरसावले. शनिवारी वेंगुर्लेतील नागरिकांनी घेतलेल्या निर्णयास पूर्ण सहभाग व पाठींबा देण्यासाठी युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गावडे, नागरी कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले, व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, स्थानिक ज्येष्ठ ग्रामस्थ बाली गांवकर, सामाजिक कार्यकर्ते भाई मोरजे, माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, राजन गिरप, प्रदीप वेंगुर्लेकर, वैभव गावडे, अनुप गावडे, कृष्णा गांवकर, समाधान बांदवलकर, गिरगोल फर्नांडिस, श्रीराम कांदळगांवकर, गणपत चोडणकर, अंकुश मलबारी, श्रीकांत रानडे, सतेज मयेकर, महेश गांवकर, मंगेश मलबारी आदी प्रमुख नागरीकांच्या झालेल्या चर्चेत हा तलाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सध्या ताब्यात असल्याने व नगरपरिषद गेली १० वर्षे या तलावाकडे दुर्लक्ष करीत असल्याने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांची येत्या ३0 मे सोमवारी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करुन तलावाच्या साफसफाईचा व गाळ काढण्याचा निर्णय निश्चित करु व ५ ते ६ दिवसांत गाळ व साफसफाईचे काम लोकसहभागातून पूर्ण करुया, असे आश्वासन युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गावडे यांनी दिले. सोमवारी ७ जणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांचेकडे या तलावाच्या गाळ काढणे व स्वच्छतेच्या लोकसहभागातील कामासाठी भेट घेईल असेही स्पष्ट करण्यात आले. नारायण तलावाची दक्षिणेकडील भिंत ही या धरणासाठी फार महत्वाची आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या धरणाच्या खोदाईत दक्षिणेकडील भिंतीची ५ फूट तलाव खोली केली. त्यावेळी त्या ५ फूटाचे बांधकाम भक्कम व मजबूत स्वरुपात केले नसल्याने पाणी पाझरुन ते वाहून जाते. या तलावाच्या उर्वरीत भिंतीचे बांधकाम करण्यापेक्षा दक्षिणेकडील धरणाची मुख्य भिंत ही नवीन व मजबुतीने बांधल्यास धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होईल, असे ज्येष्ठ ग्रामस्थ बाली गांवकर यांनी यावेळी स्पष्ट केले. वेंगुर्ले शहरात ओल्या, सुक्या, लोखंडी, काच व प्लॅस्टीक कच-याच्या स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष दिले आहे असे असताना नारायण तलाव व परिसर स्वच्छतेकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही का? शासन जलस्तोत्र विकासास सर्वप्रथम प्राधान्य दिले असे असताना नगरपरिषदेचे नारायण तलावाकडे दुर्लक्ष ही बाब गंभीर असल्याचे स्थानिक नागरीकांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)