शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

कोकण मंडळ इमारत प्रश्न प्रलंबित

By admin | Updated: March 31, 2015 00:22 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा : पहिल्या सभेत विचारला गेला होता प्रश्न

टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोकण विभागीय शिक्षण मंडळाचे कार्यालय गेली तीन ते चार वर्षे भाड्याच्या इमारतीमध्ये भरत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा मिळूनदेखील इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. मंडळ सदस्यांच्या पहिल्या तदर्थ सभेमध्ये याबाबत सदस्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. परंतु याबाबत अंमलबजावणी झाली नाही.विशेष बाब म्हणून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी कोकण विभागीय शिक्षण मंडळाची निर्मिती करण्यात आली. यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र आर्थिक तरतूद केली असल्याचे सांगितले जाते. कोकण मंडळासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय इमारत उभी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून काजरघाटी धार या ठिकाणी जागा मंजूर झाली आहे. ही जागा आता मंडळाच्या ताब्यात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेली जागा मंडळाच्या ताब्यात येऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटूनदेखील अद्याप या जागेला संरक्षक कठडादेखील बांधण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी करण्यापलिकडे कोणतेही विशेष काम आजपर्यंत झालेले नाही. याबाबत विभागीय मंडळात विचारणा केली असता बांधकाम करण्याचे सर्वस्वी अधिकार हे राज्य मंडळाकडे असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे विभागीय मंडळाकडून याबाबत पाठपुरावा होऊनदेखील राज्य मंडळाच्या संमतीशिवाय बांधकाम सुरु होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.सध्या विभागीय मंडळ भाड्याच्या जागेमध्ये चालू आहे. या जागेसाठी मंडळाला प्रतिमहिना १,७५,००० रुपये भाडे द्यावे लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाड्याची रक्कम मोजावी लागत असल्याने अगोदरच आर्थिकदृष्ट्या तोट्यात असणाऱ्या मंडळाला हा मोठा आर्थिक फटका बसत आहे. यासाठी लवकरात लवकर स्वत:च्या मालकीची इमारत उभी करण्यासाठी मंडळाने विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. मंडळाने या सर्व गोष्टीची दखल घेऊन इमारतीचा प्रश्न मार्गी लावावा व जिल्हाधिकाऱ्यांनी जागा दिल्यानंतरही त्या जागेबाबत कोणतीच हालचाल करण्यात येत नसल्यामुळे काहिंनी नाराजी व्यक्त केली. काजरघाटी येथील जागा मंडळाच्या ताब्यात आहे. मात्र, तेथे इमारतीचे बांधकाम कधी सुरू करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. भाड्यापोटी दर महिन्याला द्यावे लागणारे पैसे इमारत झाल्यास टळू शकतील. (वार्ताहर)नवीन जागेमध्ये कोकण विभागीय मंडळाच्या मालकीची इमारत उभी करण्याच्या दृष्टीने राज्य मंडळाकडून प्रक्रिया सुरु आहे. राज्य अध्यक्ष गंगाधर म्हणाणे यांनी जागेची पाहणी केली आहे. बांधकामाची प्रक्रिया सुरु होईल.- व्ही. व्ही. गिरी.