शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

हलगर्जीपणामुळे गोपनीय प्रेसवर दंडात्मक कारवाई?

By admin | Updated: March 13, 2015 23:55 IST

प्रश्नपत्रिका गोंधळ : चौकशी होणार; पॅकिंग प्रक्रियाही सदोष असल्याची शंका

रत्नागिरी : दहावी परीक्षेमध्ये अपुऱ्या प्रश्नपत्रिकांचा गोंधळ चिपळूण, रत्नागिरी पाठोपाठ आता सिंधुदुर्गातील सावंतवाडी, कसाल, कुडाळ केंद्रांवर ही पोहोचला आहे. गोपनीय प्रेसच्या हलगर्जीपणामुळेच प्रश्नपत्रिका अपुऱ्या पडण्याचा गोंधळ निर्माण झाला असल्याने चौकशी करून त्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे सचिव एस. गिरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. अर्थात प्रेसचे नाव घेतले जात असले, तरी पेपर पॅकिंगचे काम परीक्षा मंडळाच्या मार्गदर्शनातच होते. त्यामुळे पॅकिंग करताना झालेल्या गोंधळाची जबाबदारी कोणावर निश्चित केली जाणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.चिपळूणमध्ये व रत्नागिरीमध्ये दहावीच्या हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिका कमी प्राप्त झाल्या. पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अपुऱ्या प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात प्रश्नपत्रिकांच्या छायांकित प्रती काढून वितरित करण्यात आल्या.प्रत्येक शाळांकडून परीक्षेचे अर्ज भरून घेतल्यानंतर जिल्हानिहाय माहिती कोकण बोर्डाच्या परीक्षा मंडळाकडे पाठविण्यात येते. त्यानुसार परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थी संख्येनुसार पेपर वितरित करण्यात येतात. अधीक्षक, स्थायी कर्मचारी, ज्येष्ठ कारकून, परीक्षकांच्या उपस्थितीत पेपर पॅकिंग करून पाठविले जातात. त्यानुसार कोकण बोर्डाच्या रत्नागिरी कार्यालयाकडे दोन टप्प्यांत पेपर उपलब्ध झाले. मात्र, संबंधित विषयांचे पेपर पॅकिंग परीक्षेच्याच दिवशी परीक्षा केंद्रावर उघडण्यात येतात. त्यानुसार पेपरचे वितरण केले जाते. चिपळूणमध्ये संयुक्त हिंदीचा पेपर असताना हिंदी पेपर क्रमांक २ व ३ चे पेपर उपलब्ध झाले. शिर्के हायस्कूलमध्ये हिंदीऐवजी संयुक्त हिंदीचे पेपर आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूमितीच्या पेपरप्रसंगी पॅकिंगवर इंग्रजी माध्यम लिहिले असताना आतमध्ये मराठी माध्यमांचे भूमितीचे पेपर आढळले. परीक्षेचे पेपर भरताना केलेल्या चुकीमुळे पेपर विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे प्राप्त झाले नाहीत. परिणामी ऐनवेळी धावाधाव करावी लागली, असेही एस. गिरी यांनी सांगितले.शाळानिहाय, केंद्राप्रमाणे विद्यार्थी संख्या, माध्यम, संपूर्ण माहिती परीक्षा मंडळाकडे कळविली जाते; परंतु पेपर भरताना केलेल्या चुकीमुळे पेपर कमी प्राप्त होत आहेत. वास्तविक पेपर पॅकिंगचे काम कडेकोट बंदोबस्तात केले जाते. स्थायी कर्मचारीच पॅकिंग करीत आहेत.पेपरच्या पार्सलवर लिहिल्याप्रमाणे आत पेपर असणे आवश्यक आहे; परंतु तसे नसल्यामुळे हा प्रकार घडत आहे. शिवाय पेपरच्या दिवशी केंद्रावर पेपर पार्सल उघडल्यानंतर संबंधित प्रकार निदर्शनास येत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी