शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशी अडकले, रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; मळगाव रेल्वेस्थानकात पोलीस बंदोबस्त

By अनंत खं.जाधव | Updated: October 1, 2023 19:28 IST

प्रवाशांची मोठी गर्दी

सावंतवाडी : पनवेलनजीक घसरलेल्या मालगाडीमुळे कोकण रेल्वे वाहतुकीला चांगलाच फटका बसला आहे. काही गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे, त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.त्यामुळे सावंतवाडीतील मळगाव रेल्वे स्थानकावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून परतीचा प्रवास करणारे अनेकजण अडकून पडले आहेत 

शनिवारी पनवेल येथे मध्य रेल्वेच्या मालगाडीचे डबे घसरले. ते बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र त्यामुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकाला चांगलाच फटका बसला आहे. काही गाड्या स्थानकांमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.तर काहि रेल्वे गाड्या या उशिरापर्यंत रद्द करण्या बाबत निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरचे वेळापत्रक कोलमडले आहे. 

या सर्वाचा मोठा फटका हा गणेश चतुर्थी साठी आलेले चाकरमानी हे परतीच्या मार्गावर आणि ऐनवेळी हा प्रकार घडल्याने सर्व स्थानकात गर्दी झाली आहे.हा प्रकार घडल्यानंतर रेल्वे ने कोणतीही माहिती दिली नाही.तसेच काहि रेल्वे गाड्या रद्द केल्या हे ही कळविण्यात आले नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले.

रेल्वे च्या या गलथान कारभारामुळे प्रवाशी चांगलेच संतप्त झाले त्यामुळेच ठाण्यात प्रवाशांकडून रेल रोको आंदोलन छेडण्यात आले होते.ठिकठिकाणी प्रवाशाचा उद्रेक झाला तसाच प्रकार सावंतवाडीत होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

 वेगवेगळ्या रेल्वे गाड्या साठी मळगाव स्थानकात प्रवाशी आले असून ते दिवसभर स्थानकात च ताटकळत उभे होते.कोणती गाडी कधी येईल याची माहिती नसल्याने  प्रवाशाचा भावनाचा उद्रेक होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून स्वता पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे प्रवाशांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देतना दिसत आहेत.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेSawantwadiसावंतवाडी