शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पारकरांनी प्रसिद्धीसाठी राणेंवर टीका करू नये : समीर नलावडे यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 15:43 IST

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला कोरोनामुळे त्रास होऊ नये म्हणून आमदार नीतेश राणे यांनीच सामाजिक भान राखत अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. या काळात आता टीका करणारे संदेश पारकर कुठे बैठक घेत होते ते कणकवलीवासीयांना माहिती आहे. त्यामुळे नीतेश राणेंवर टीका करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा टोला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देपारकरांनी प्रसिद्धीसाठी राणेंवर टीका करू नये : समीर नलावडे यांचा टोला नीतेश राणे यांनी सामाजिक भान राखत राबविल्या उपाययोजना

कणकवली : लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला कोरोनामुळे त्रास होऊ नये म्हणून आमदार नीतेश राणे यांनीच सामाजिक भान राखत अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. या काळात आता टीका करणारे संदेश पारकर कुठे बैठक घेत होते ते कणकवलीवासीयांना माहिती आहे. त्यामुळे नीतेश राणेंवर टीका करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा टोला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला आहे.संदेश पारकर यांनी आमदार नीतेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला नलावडे यांनी उत्तर दिले. त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हावासीय कोरोनापासून दूर रहावेत यासाठी आमदार नीतेश राणे यांनी अनेक उपक्रम व उपाययोजना राबविल्या. जिल्हावासीयांच्या आरोग्याला प्राधान्य देत वेळोवेळी प्रशासनाला सूचनाही केल्या. साहित्य वाटप हे सर्व नीतेश राणे यांनी स्वखर्चातून केले.राज्य सरकार कोरोना रोखण्यासाठी सिंधुदुर्गाला एकही दमडी देत नसताना नीतेश राणे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली. पण सत्ताधारी पक्षात असलेले पारकर हे जनतेच्या काळजीपेक्षा आपल्या बैठकांमध्ये मग्न होते. त्यांच्या बैठका कुठे चालायच्या ते कणकवली शहरातील जनता जाणते. त्यामुळे राणेंवर टीका केली की प्रसिद्धी मिळते म्हणून पारकर यांचा हा खटाटोप सुरू आहे.

पारकर यांनी गेल्या अडीच महिन्यात असा कोणता सामाजिक उपक्रम राबविला किंवा कोरोनाला रोखण्यासाठी काय केले ते जाहीर करावे. शिवसेनेच्या नेत्यांच्या पदराआड राहून प्रसिद्धीत राहण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. कोरोना काळात जनतेचे हित जपण्यापेक्षा स्वत:च्या हिताचा जास्त विचार पारकर यांनी केला.ज्या कणकवली शहरातील जनतेने त्यांना सरपंच ते नगराध्यक्षपदापर्यंत पदे दिली त्या जनतेसाठी पारकर यांनी आतापर्यंत काय केले ? साधे मास्क वाटपही स्वखर्चातून त्यांना करता आले नाही. किंवा शासनामार्फतही कोणताही निधी कोरोना उपाययोजनांसाठी पारकर यांनी आणला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.पारकरांकडून जबाबदारीची अपेक्षा ठेवणे चुकीचेकोरोनाच्या काळात पारकर कणकवली शहरात खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे पारकर यांच्या मनात शहरवासीयांच्या आरोग्याची किती काळजी आहे हे दिसून येते. अशा स्थितीत पारकर यांच्याकडून जबाबदारीची अपेक्षा ठेवणे ही चुकीचेच आहे, असेही नलावडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्गSandesh Parkarसंदेश पारकरNilesh Raneनिलेश राणे