शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

मुलासाठी आई-वडिलांची दाहीदिशा

By admin | Updated: November 23, 2015 00:03 IST

दोडामार्गमध्येच सापडला : पोलिसांनी जंगल पिंजून काढले

कसई दोडामार्ग : अंगावर कोणतेही वस्त्र नसताना वर्षाच्या मुलाने रात्र जंगलात काढल्याची घटना मंगळवारी दोडामार्ग येथे घडली. मुलगा अचानक गायब झाल्याने घाबरलेल्या मजूर कुटुंबाने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनीही मुलाच्या शोधासाठी जंगल परिसर पिंजून काढला. पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर बुधवारी येथील पेट्रोल पंपाजवळ मुलगा आढळून आला आणि पोलिसांसह सर्वांनीच मोकळा श्वास घेतला. कर्नाटक विजापूर येथून मोलमजुरीसाठी काही कामगार सहकुटुंब दोडामार्ग येथे दाखल झाले आहेत. यापैकीच एक सदाशिव मादर. मंगळवारी सायंकाळी त्यांची पत्नी दोडामार्गपासून जवळच असलेल्या कालव्याच्या नाल्याजवळ कपडे धुण्यासाठी गेली होती. सोबत चार वर्षांचा श्रीकांतही होता. कपडे धुवून झाल्यानंतर ती पुन्हा झोपडीकडे परतली. मागून मुलगा येतोय, असे समजून तिने मागे वळूनही पाहिले नाही. घरी आल्यानंतर तिने पाहिले तर मागे मुलगा नव्हताच. तिने पुन्हा नाल्याजवळ धाव घेत तिथे शोधाशोध केली. तेथेही तो न आढळून आल्याने घाबरलेल्या मजूर कुटुंबाने दोडामार्ग पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनीही तेथील जंगल परिसर पिंजून काढला. कालव्यानजीकही शोध घेतला. पणसर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. श्रीकांत कोठेही आढळून आला नाही. अवघे चार वर्षांचे पोर. अंगावर कपडाही नाही आणि रात्रभर जंगलात. थंडीचे दिवस. हिंंस्र प्राण्यांची भीती. या आणि अशा अनेक विचारांनी आईवडिलांची पाचावर धारण बसली. संपूर्ण रात्र जागवून काढली. अखेर बुधवारी सकाळी येथील एका पेट्रोलपंपाच्या मागे हा मुलगा रडत असताना तेथाील कामगारांना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेत त्याला पालकांच्या स्वाधीन केले. अंगावर एकही कपडा नसताना, जंगली श्वापदांची भीती असताना पूर्ण रात्र जंगलात काढलेला चार वर्षांचा बालक सर्वांसाठीच आश्चर्याचा विषय ठरला असून, बुधवारी दिवसभर या घटनेची परिसरात चर्चा होती. (वार्ताहर)