शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ १५ निर्णय; मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर
2
९ ते ५ दरम्यान कर्मचाऱ्यांवर 'क्लोज वॉच', 'फोनाफोनी'चाही घेणार 'हिशेब'; Amazon मध्ये 'पैसे बचाओ' पॉलिसी
3
"ट्रम्प यांना अर्थशास्त्राची काहीच समज नाही..," 'या' दिग्गज विश्लेषकानं दिला इशारा
4
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; NCP ची तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या
5
फिटनेस टेस्ट पास झाला! आता हा ठरू शकतो हिटमॅनच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा; इरफान पठाण म्हणाला...
6
किम जोंग उनची १२ वर्षांची मुलगी जगभरात चर्चेत! वडिलांसोबत चीनमध्ये का गेली किम जू?
7
Chanakya Niti: चाणक्यनीतीनुसार, संसारात 'या' पाच गोष्टी असतील तर नवरा बायकोचा घटस्फोट कधीच होणार नाही
8
'या' तीन देशांमधून भारतात येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्टशिवाय राहण्याची परवानगी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
"कुठल्याही जातीला उचलून...! 'हा' अधिकार कुठल्याही सरकारला नाही, आम्ही न्यायालयात जाणार"; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
k Kavitha: वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला
11
बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार, कधी सुरू होणार; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
12
महागडी कार, लग्झरी फ्लॅट अन् बरेच काही...; श्रीमंतीच्या मायाजाळात कसा अडकतोय 'कॉमन मॅन'?
13
मध्यरात्री पीजीमध्ये शिरला मास्कमॅन; तरुणीचे हात-पाय बांधले अन्...; धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ
14
सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात जोरदार तेजी, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार? चांदीचे दर काय?
15
टीआरएफला मलेशिया मार्गे पैसा मिळतोय, लाखो रुपये झाले जमा; एनआयएच्या तपासात उघड
16
सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर
17
Nifty थेट शून्यावर, झिरोदामध्ये तांत्रिक बिघाड; नितीन कामथ झाले ट्रोल
18
“मराठा आरक्षणात CM फडणवीसांचा सिंहाचा वाटा, लक्ष्मण हाकेंनी लुडबूड करू नये”: विखे-पाटील
19
भारताचा 'मोस्ट वॉन्टेड' गँगस्टर बादली अखेर पोलिसांच्या ताब्यात! कंबोडियावरून आणले भारतात
20
"सध्या कमबॅक करणार नाही...", दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा निर्णय; लग्नाआधीच झालेली प्रेग्नंट

पंचतंत्र अन् इसापनिती

By admin | Updated: November 20, 2014 00:23 IST

बांधकाम कामगार : १ लाख मुलांना मिळणार पुस्तकांचा संच

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -राज्यात इमारत व इतर बांधकाम कामगारांची १ लाख मुले आता स्पीकवेल मराठी, पंचतंत्र व इसापनिती शिकणार आहेत. त्यासाठी प्रत्येक मुलाला ९ पुस्तकांचा प्रत्येकी हजार रुपये किमतीचा संच दिला जाणार असून, त्याचे वाटप रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे या महत्त्वाकांक्षी योजनेची पुस्तके नवनीत एज्युकेशन लिमिटेड, मुंबई या कंपनीकडून घेण्यात आली असून, त्यासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या मंडळातर्फे ३० जुलै २०१४ रोजीच्या बैठकीत इमारत बांधकाम कामगारांच्या पाल्यास प्रत्येकी हजार रुपयांचा शैक्षणिक उपयोगाच्या नऊ पुस्तकांचा संच भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या योजनेची कार्यवाही आता सुरू झाली आहे. या पुस्तक खरेदीवर कंपनीने १० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे १११५ रुपयांचा हा नऊ पुस्तकांचा संच मंडळाला १००३ रुपये ५० पैसे किमतीला प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत कामगारांच्या एक लाख मुलांना जी ९ पुस्तके दिली जात आहेत, त्यामध्ये स्पीकवेल मराठी, जनरल नॉलेज मराठी, नवनीत अ‍ॅडव्हान्स डिक्शनरी, पंचतंत्र बूक (मराठी), पंचतंत्र बुक २ (मराठी), पंचतंत्र बुक ३ (मराठी), इसापनिती बुक १ (मराठी), इसापनिती बुक २ (मराठी), इसापनिती बुक ३ (मराठी) आदी विविध पुस्तकांचा समावेश आहे. बांधकाम कामगारांची मुले वाचनापासून कायम पारखी असतात. त्यामुळे ही महत्वाकांक्षी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचा एक लाख मुलांना लाभ देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.संचानंतर हवे मूल्यमापनयोजनेतील पुस्तकांचे संच जरी कामगारांच्या मुलांना देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात त्या मुलांनी या पुस्तक संचाचा अभ्यास करून लाभ घेतला आहे काय, त्यांच्या ज्ञानात भर पडली आहे काय, याबाबतची तपासणी होणार का, असा सवाल निर्माण झाला आहे. केवळ संच दिले व त्या पुस्तकांचा गठ्ठा तसाच ठेवला गेला तर या ज्ञानवृध्दिच्या योजनेचा उद्देशच सफल होणार नाही. त्यामुळे हे संच दिल्यानंतर त्याबाबत प्रबोधन करण्याची व त्या मुलांनी त्या पुस्तकांचे वाचन केले काय, त्यातून त्यांना काय लाभ झाला, याच्या मूल्यमापनाची गरज आहे.दहा कोटींचा खर्चरत्नागिरीतील ४२०० मुलांना योजनेचा लाभया योजनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगारांच्या ४२०० पेक्षा अधिक शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांना हा शैक्षणिक पुस्तकांचा संच दिला जात आहे. तेवढे संच कामगार आयुक्त कार्यालयाकडे आल्याची माहिती कामगार उपायुक्त अनिल गुरव यांनी दिली. जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्यास याचा अधिक लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील कामगारांच्या मुलांसाठी दिलेल्या पुस्तकांसाठी ४२ लाख रुपये खर्च आला आहे. वितरणावर मंडळाची नजर...शासनाच्या योजनांमागील उद्देश नेहमीच चांगला असतो. परंतु त्या योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या झाली नाही तर योजना फसते. या योजनेचे तसे होऊ नये म्हणून प्रत्येक जिल्ह्याला किती पुस्तक संच मिळाले, त्याचे वितरण कसे झाले, याबाबतची तपशीलवार माहितीच मंडळाने मागितली आहे. त्यामुळे शिस्तबध्दतेने या संचांचे वितरण कामगारांच्या मुलांना करावे लागणार आहे.