शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: May 15, 2015 23:33 IST

मुंबरकरांवरील कारवाई मागे घ्या : जिल्ह्यातील सर्व कर्मचारी एकवटले

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तलाठी, मंडल अधिकारी आणि कोतवालांचे शुक्रवारी जिल्हाधिकारी भवनासमोर लक्षणीय धरणे आंदोलन झाले. निलंबित मंडल अधिकारी मुंबरकर यांना पुन्हा रुजू करा, या मागणीसाठी ३५० कर्मचारी एकवटल्याने या कर्मचाऱ्यांची संघटनात्मक ताकद दिसली.रत्नागिरी- सिंधुदुर्ग तलाठी संघाच्या नेतृत्वाखाली ६ मेपासून जिल्ह्यातील तलाठी, मंडल अधिकारी आणि कोतवालांचे आंदोलन सुरू झाले आहे. आचरेचे प्रभारी मंडल अधिकारी बी. जे. मुंबरकर यांनी वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई अन्यायकारक आहे. वाळू किंवा गौणखनिज तसेच अन्य कोणत्याही प्रकारचे गुन्हे मंडल अधिकारी, तलाठी यांच्यामार्फत दाखल करण्यात येऊ नयेत, अशी मागणी या संघटनेने शासनाकडे पूर्वीच केलेली आहे. ज्या दिवशी वाळूची चोरी झाल्याची घटना घडली त्या दिवशी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे नायब तहसीलदारांनी हे गुन्हे दाखल करायला हवे होते. तसे न करता मंडल अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावरच १ मे रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने तलाठी, मंडल अधिकारी व कोतवाल या सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे, असेही या संघटनेचे अध्यक्ष एस. व्ही. गवस यांनी स्पष्ट केले आहे.राज्य शासनाने सन २०१० मध्ये परिपत्रक काढले आहे. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वाळू किंवा गौणखनिज उत्खननाकरिता पर्यायांची निर्मिती कशाप्रकारे असावी? पथक प्रमुख कोण असावा? गुन्हे कोणी दाखल करावेत? हे त्या परिपत्रकात नमूद आहे. मंडल अधिकाऱ्यांनी हे गुन्हे दाखल करू नयेत, असे असतानाही वरिष्ठ अधिकारी खात्यांच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडत आहेत ही खेदाची बाब आहे, असेही मत रत्नागिरी-सिंधुदुर्ग तलाठी संघटनेचे संघटनाध्यक्ष एस. व्ही. गवस यांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)...तर बेमुदत सामूहिक रजेवरजिल्हा महसूल प्रशासनाने त्या मंडल अधिकाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे न घेतल्यास जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडल अधिकारी आणि कोतवाल १६ मेपासून सामूहिक रजेवर जातील व पूर्णपणे कामबंद करतील, असाही इशारा या संघटनेने जाहीर केला आहे. महसुली काम ठप्पशुक्रवारी जिल्हाधिकारी भवनासमोर झालेल्या या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील ३५० कर्मचारी, तलाठी, मंडल अधिकाऱ्यांनी सहभाग घेतल्याने गावातील महसुली कामकाज ठप्प झाले आहे. जिल्हाध्यक्ष एस. व्ही. गवस, उपाध्यक्ष एस. जी. जाधव, सरचिटणीस डी. एम. पाटील, एन. जी. बांबरकर, कोदे, यादव, विलास डगरे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदनही सादर केले.