शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 14:25 IST

आंबोली घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले असून, एकेरी वाहतूक सुरू आहे.

सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडत आहेत. आंबोली येथील घाटात दरडीचा काही भाग रस्त्यावर कोसळला आहे. ही घटना पूर्वीचा वस देवस्थानपासून खाली दोनशे मीटर अंतरावर घडली आहे. गेल्या चार ते पाच दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली घाट असुरक्षित बनला असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचं वारंवार निदर्शनास आलं आहे. आंबोली घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले असून, एकेरी वाहतूक सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसात दरवर्षी दरड कोसळण्याचे प्रकार आंबोली घाटात घडत असतात.कोरोनाच्या संकटामुळे आंबोली वर्षा पर्यटनासाठी बंद असली तरी कोल्हापूर-बेळगावमार्गे दिशेनं ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची मोठी वर्दळ असते. तत्पूर्वीही अशाच दरडी कोसळून दोघांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं उपाययोजना करून घाटातील दुहेरी वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिकांकडून केली जात आहे.