शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

सहा कोटीचे जादा उत्पन्न

By admin | Updated: April 3, 2015 00:47 IST

परिवहन महामंडळ : दोन वर्षांपेक्षा यंदा अधिक उत्पन्न, एस. टी.च्या विविध योजनांचा फायदा

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला गेल्या दोन वर्षांपेक्षा यावर्षी अधिक उत्पन्न मिळाले आहे. चालू वर्षी २३५ कोटी ७३ लाख ६४ हजारांचे उत्पन्न आगाराने मिळविले आहे. रत्नागिरी विभागाला ६ कोटी १३ लाखांचे अधिकचे उत्पन्न यावर्षी लाभले आहे.ग्रामीण भागाची जीवनवाहिनी ठरलेली एस. टी. वाडीवस्तीवर पोहोचली आहे. परंतु, अनेकवेळा कमी भारमानामुळे अनेक फेऱ्या तोट्यात चालवाव्या लागतात. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत रत्नागिरी विभागाने अधिक उत्पन्न मिळवल्याने रत्नागिरी विभागाला ‘अच्छे दिन’ आले असल्याचे दिसून येत आहे. २०१२-१३ मध्ये १९७ कोटी ६१ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळाले, तर २०१३-१४ मध्ये २१९ कोटी ६० हजारांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.रत्नागिरी विभागामध्ये ७८४ गाड्या असून २ लाख २५ हजार किलोमीटर इतकी वाहतूक करण्यात येते. दररोज किमान ५३ हजार लीटर डिझेलचा वापर केला जातो. चालक १७३८ असून वाहक १५५५ आहेत. दररोज ९ हजार फेऱ्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरु आहे. खासगी वाहतुकीचा एस.      टी.च्याउत्पन्नावर परिणाम होत असला, तरी यावर्षी रत्नागिरी विभागाने मागेल त्याला गाडी ही अभिनव संकल्पना राबविली. याशिवाय प्रवासी वाढवा अभियानांतर्गत अधिकाधिक प्रवासी गाडीत घेऊन वाहतूक केली. एकूणच एस. टी.ला मागणी वाढत आहे. याशिवाय निवडणुका, यात्रोत्सव, सहली, लग्नसराई यामध्ये एसटीला मागणी होत आहे. तसेच कोकण रेल्वे ठप्प झाल्यास एस. टी.चे सहाय्य घेतले जात असल्याने साहजिकच एस. टी.च्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हे उत्पन्न वाढेल असा विश्वास एस. टी.चे अधिकारी व्यक्त करीत आहेत.(प्रतिनिधी)एसटीच्या रत्नागिरी विभागाची आगारनिहाय वाढ (कोटीत)आगार१४/१५१३/१४१२/१३दापोली२८.८१.४९२६.३८.७१२४.४७.४८खेड२८.८०.२५२६.५०.३१२३.४४.२३चिपळूण३९.१७.३८३५.६०.१९३२.३३.६५गुहागर२४.५२.०७२२.६१.९३२०.०७.११देवरुख२३.५९.३७२३.३६.०४२०.३१.९५रत्नागिरी४८.०५.९७४४.५९.८०४१.२९.१७लांजा१४.८२.९३१४.१४.९७१२.११.४६राजापूर१६.३०.३६१५.७९.५२१३.७७.२७मंडणगड११.६३.८२१०.१९.१३०९.७९.१८एकूण२३५.७३.६४२२९.२०.६०१९७.६१.५०