शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३००० ‘सुकन्यां’च्या ‘समृद्धी’ची हमी

By admin | Updated: March 22, 2015 00:33 IST

टपाल खाते : रत्नागिरी जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद

शोभना कांबळे / रत्नागिरी शून्य ते १० वर्षांच्या आतील बालिकांच्या कल्याणासाठी भारतीय टपाल खात्याने २२ जानेवारीपासून सुरू केलेल्या ‘सुकन्या समृद्धी’ अल्पबचत योजनेला जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सुमारे ३०५० खातेदारांनी आपल्या मुलीच्या नावे खाती उघडली आहेत. बालिकांच्या कल्याणासाठी भारतीय टपाल विभागातर्फे २२ जानेवारीपासून ‘सुकन्या समृद्धी खाते’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ १ ते १० वर्षांच्या आतील बालिकांना मिळतो. योजनेची सुरूवात म्हणून एक वर्ष विशेष सवलत देण्यात आली असून, त्यानुसार यावर्षीच फक्त २ डिसेंबर २००३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलीच्या नावे हे खाते उघडता येणार आहे. मात्र, सुरूवातीला १००० रूपये भरून खाते उघडता येईल. एका आर्थिक वर्षात कमीत कमी १००० रूपये किंवा जास्तीत जास्त १,५०,००० एवढी गुुंतवणूक करता येईल. खाते उघडल्याच्या तारखेपासून चौदा वर्षे होईपर्यंत या खात्यात पैसे भरावे लागतील. आर्थिक वर्षात किमान १००० रूपये जमा न झाल्यास खाते अनियमित होईल. मात्र, असे झाले तरीही ५० रूपये भरून खाते पुनरूज्जीवित करता येईल. तसेच ही गुंतवणूक कर कपातीसाठीही पात्र धरण्यात येणार आहे. यासाठी नामनिर्देशनपत्राची आवश्यकता भासणार नाही. मात्र, या योजनेचा दोन लाभ केवळ मुलींसाठीच घेता येईल. या गुंतवणुकीवर ९.१ टक्के इतके व्याजही मिळणार आहे. ‘सुकन्या समृद्धी खाते’ या योजनेचा लाभ सामान्य पालकांना घेता येणे शक्य आहे. तसेच हे खाते एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरीत करणेही सहजशक्य आहे. मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर उच्चत्तम शिक्षण आणि विवाह यासाठी ५० टक्के रक्कम काढता येण्याची सोय आहे. तसेच २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे खाते बंद करता येईल. मुलींसाठी अतिशय उत्तम अशी ही योजना असल्याने जिल्हाभरातून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत म्हणजे या दोन महिन्यातच सुमारे ३०५० इतके या योजनेचे खातेदार झाले आहेत. यापुढेही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक पालकांनी आपल्या नजीकच्या पोस्ट कार्यालयात संपर्क साधून या योजनेचा लाभा घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक बी. आर. सुतार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)