सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुलांचा अंतिम आकडा निश्चित झाला आहे. जिल्ह्यात सध्या १५८ बालके ही शाळाबाह्य म्हणून निश्चित केली असून, त्यांना लवकरच शिक्षण प्रवाहात आणण्यात येणार आहे.राज्य शासनाने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम ४ जुलै रोजी निश्चित केली होती. त्यानुसार सिंधुदुर्गात त्यांची अंमलबजावणी होऊन शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे करण्यात आला. त्यात प्राथमिक माहितीत १५० मुले ही शाळाबाह्य आढळली होती. आता अंतिम आकडेवारी निश्चित करण्यात आली असून, जिल्ह्यात १५८ बालके शाळाबाह्य आहेत. (प्रतिनिधी)या मुलांना शिक्षण प्रवाहात आणणारराज्य शासनाच्या आदेशानुसार या सर्व शाळाबाह्य १५८ बालकांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षण मिळावे यासाठी त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यात येणार आहे. या मुलांना लवकरच शाळेत दाखल करून घेण्याची कार्यवाही सुरू होणार आहे.कधीच शाळेत न गेलेली ११४ मुले आढळली६ ते १४ या वयोगटातील ११४ बालकांनी शाळेत कधीच प्रवेश केला नाही. यामध्ये जास्तीत जास्त मोलमजुरी करणाऱ्या तसेच परप्रांतीय मजुरांच्या पाल्यांचा समावेश असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, तर ४४ बालकांनी मध्येच शाळा सोडल्याची माहिती शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात नोंद करण्यात आली आहे.राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गात कमी मुलेराज्यात एकाचवेळी करण्यात आलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात सिंधुदुर्गात १५८ बालके शाळाबाह्य आढळली.मात्र, राज्यातील इतर जिल्ह्यांचा विचार करता सिंधुदुर्गात शाळाबाह्य मुले कमी आढळल्याचे बोलले जात आहे.
शाळाबाह्य १५८ बालकांची नोंद
By admin | Updated: July 8, 2015 21:40 IST