शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
5
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
6
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
7
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
8
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
9
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
10
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
11
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
12
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
13
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
14
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
15
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
16
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
17
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
18
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
19
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
20
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

अन्य समाजाप्रमाणे सुतार समाजही महत्त्वाचा

By admin | Updated: February 4, 2015 23:56 IST

बाबी मेस्त्री यांचे प्रतिपादन : विश्वकर्मा जयंती साजरी

सावंतवाडी : सुतार समाजाला सुतार समाज हादेखील समाजातील अन्य समाजाप्रमाणे वागत नसला, तरी त्या समाजाएवढेच महत्त्व आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक बाबी मेस्त्री यांनी केले. श्री विश्वकर्मा सुतार समाज मंडळ, सावंतवाडी यांच्यावतीने येथील दैवज्ञ गणपती मंदिरात विश्वकर्मा जयंती सोमवारी साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अरुण सुतार, अनिल मेस्त्री, प्रवीण माडये, शरद पांचाळ, बाबी मेस्त्री (कास), अशोक दाभोळकर, शंकर मेस्त्री, श्रीराम पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी बाबी मेस्त्री म्हणाले, सुतार समाजाला कोणताही शाप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विश्वकर्माची आपल्यावर कृपा असल्याने आपण कोणत्याही भ्रमात न राहता आपल्या कला आत्मसात केल्या पाहिजेत. सर्व कला जपल्या पाहिजेत. सुतार समाजाला सर्व प्रकारच्या कला येत असून यातून उन्नती साधली पाहिजे. शिल्पकला, लोखंडी, सोने, गाडी या सर्व वस्तू बनविण्यासाठी सुतारांचाही समावेश असून सुतार समाजाने कधीही आपल्याला कमी न लेखता एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे, असे मेस्त्री यांनी सांगितले. यावेळी सकाळी नऊ वाजता विश्वकर्माचे पूजन करण्यात आले. भजन, नामस्मरण करून थाटात जयंती साजरी करण्यात आली. तसेच महिलांसाठीही समारंभ आयोजित करण्यात आला. बाहेरगावाहून आलेल्या सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले. यावेळी दहावी व बारावीच्या उत्तीर्ण मुलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. दुपारी उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यानंतर महिलांच्या फुगड्यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती व चर्चाविनिमय करण्यात आला. या कार्यक्रमाला रमाकांत पांचाळ, श्रीराम पेडणेकर, संतोष मेस्त्री, अशोक मेस्त्री, अभिजीत मेस्त्री, वासुदेव मेस्त्री, प्रमोद मेस्त्री, निळकंठ मेस्त्री, उज्ज्वला कालेलकर, भास्कर मेस्त्री यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव अमिंदी मेस्त्री यांनी केले. (वार्ताहर)