शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

संघटीतपणे पक्ष वाढवा

By admin | Updated: January 12, 2016 00:37 IST

चित्रा वाघ : दोडामार्गच्या राष्ट्रवादी मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन

कसई दोडामार्ग : भाकरी भाजता भाजता पाण्याची दोर तुमच्या हाती दिली. सत्तेच्या चाव्या तुमच्या हातात दिल्या. जी बाई घर चालवू शकते, ती बाई आता सत्ता चालवू शकते, असा विचार करणारा राष्ट्रवादी पक्ष आहे. या पक्षाचे नेते शरद पवार आहेत. महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. त्यामुळे तुम्ही गावोगावी जाऊन पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दोडामार्ग येथे आयोजित महिला मेळाव्यात केले.दोडामार्ग महिला राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने येथील महाराजा हॉलमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सुरेश दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष नम्रता कुबल, युवती अध्यक्ष रंजिता वेंगुर्लेकर, पूजा कर्पे, रेखा कदम, सुचिता दळवी, उपनगराध्यक्षा साक्षी कोरगावकर, तालुकाध्यक्ष अदिती मणेरीकर, मनीषा गवस, अ‍ॅड. रेवती राणे, शोभा कोळेकर, गोपाळ गवस, महादेव बोर्डेकर आदी उपस्थित होते.चित्रा वाघ म्हणाल्या, कॉग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना विकास झाला. शरद पवार यांच्यामुळेच महिलांना ३३ टक्के आरक्षणावरून ५० टक्के आरक्षण मिळाले. हा ऐतिहासिक निर्णय झाला. शेतकऱ्यांना कर्ज माफ केले. आताचे सरकार ते करू शकत नाही. म्हणजे शेतकऱ्यांबद्दल किती त्यांना आस्था आहे, हे समजते. महिलांनी संघटीत होऊन पक्षाची ताकद वाढविणे आवश्यक आहे. आपला हक्क, न्याय यासाठी प्रत्येक महिलेने पुढे येणे आवश्यक आहे. तालुक्याच्या ठिकाणी बसून न राहता लोकांपर्यंत पोहचा. त्यांच्या अडचणी काय आहेत, त्या समजून घ्या आणि काम करा. आज स्त्रीवर अत्याचार होतात. त्यावेळी स्त्री आवाज उठवत नाही. आज रेशन दुकानात धान्य खराब मिळते. त्याविरोधात आवाज उठवा. सार्वजनिक ठिकाणी शौचालये नाहीत. शाळा, कॉलेजमध्ये पन्नास विद्यार्थ्यांच्या मागे एक शौचालय आवश्यक आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशीन आहे, असे सरकार सांगते. प्रत्यक्ष मात्र अशा सोयी नाहीत. याविरूध्द आवाज उठवा. मकरसंक्रांत असल्यामुळे तिळगुळ सुरक्षा हा कार्यक्रम राबवा. ज्याठिकाणी महिला एकत्र येणार त्याठिकाणी तुमचा संपर्क वाढवा, असे आवाहन त्यांनी केले. (वार्ताहर)अन्यायाविरुध्द आवाज उठवा : संपर्क वाढवारेशन दुकानात धान्य खराब मिळते. त्याविरोधात आवाज उठवा. सार्वजनिक ठिकाणी शौचालये नाहीत. शाळा, कॉलेजमध्ये पन्नास विद्यार्थ्यांमागे एक शौचालय असणे आवश्यक आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशीन आहे, असे सरकार सांगते. प्रत्यक्ष मात्र अशा सोयी नाहीत. याविरूध्द आवाज उठवा. मकरसंक्रांत असल्यामुळे ‘तिळगुळ सुरक्षा’ हा कार्यक्रम राबवा. ज्याठिकाणी महिला एकत्र येणार त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करा, असे आवाहन त्यांनी केले.