शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

..तर ठेकेदारावर कारवाई करा

By admin | Updated: July 16, 2014 23:17 IST

नगरसेवकांची मागणी : कणकवली नगरपंचायत सभा

कणकवली : कणकवली शहरातील कचरा उचलण्याबरोबरच साफसफाई करण्यामध्ये एक दिवसाचा जरी खंड पडला तरी संबंधित ठेकेदारावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बुधवारी झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. आरोग्याशी निगडीत सेवेबाबत कोणताही ढिसाळपणा केला जाऊ नये, असेही यावेळी सुचविण्यात आले.येथील नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी संतोष वारूळे उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने शहरातील साफसफाईबाबतचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला. साफसफाई करण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराचे दोन महिन्याचे देयक का देण्यात आलेले नाही? असा प्रश्न नगरसेविका मेघा गांगण यांनी उपस्थित केला. निधी उपलब्ध नसल्याने संबंधित ठेकेदाराबरोबरच पाणीपुरवठा तसेच आरोग्य विभागाचीही देयके प्रलंबित असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. शहरातील आठवडा बाजार मंगळवारी असतो. त्यामुळे भाजी विक्रेत्यांसह अन्य विक्रेत्यांकडून टाकलेला कचरा बाजारपेठेत पडलेला असतो. हा कचरा तत्काळ साफ करणे आवश्यक आहे. मात्र, कंत्राटी कामगारांचे वेतन देण्यात न आल्याने हा कचरा साफ करण्यात आला नसल्याचे सभागृहात सांगण्यात आले. संबंधित ठेकेदाराला ठेका देताना अटी व शर्थी घालण्यात आलेल्या असतात. त्यानुसार साफसफाईचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने एक दिवसाचाही सेवेत खंड पडल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अभिजीत मुसळे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी केली. जनतेला चांगल्या सुविधा देणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र, ठेकेदारावर कारवाई केल्यानंतर सेवा ठप्प झाली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी उपस्थित केला. या प्रश्नावर सभेत जोरदार चर्चा करण्यात आली.अंगणवाडीमध्ये पोषण आहार शिजविण्यासाठी महिला मंडळांना परवानगी देणे, नगरपंचायत कार्यालयात बायोमॅट्रीक मशिन बसविणे, तेलीआळी येथील उषा कन्स्ट्रक्शनजवळील गटारांचा प्रश्न अशा विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. तसेच विविध निविदांना मंजुरी देण्यात आली. १४व्या वित्त आयोगाअंतर्गत कामे सुचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शहरातील एलईडी दिवे कधी बसविणार? असा प्रश्न नगरसेविका नंदिनी धुमाळे यांनी उपस्थित केला. याबाबतचे सर्व साहित्य उपलब्ध झाले असून ठेकेदार लवकरच कामाला सुरूवात करेल, असे नगराध्यक्षांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)