शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

नामुष्की टाळण्यासाठी अपक्षाला संधी

By admin | Updated: November 24, 2015 00:29 IST

वैभववाडी नगरविकास आघाडी : काँग्रेसने पक्षाच्या उमेदवाराला डावलल्याचा आरोप

वैभववाडी : काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष होणार नाही याची खात्री झाल्यामुळेच नामुष्की टाळण्यासाठी आमदार नीतेश राणे यांनी आम्ही निवडणूकीपुर्वी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेल्या रवींद्र रावराणे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. वैभववाडीचा पहिला नगराध्यक्ष ग्रामविकास आघाडीचा होतोय याचे आम्हाला समाधान आहे. काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर पाच वर्षात पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकाला काँग्रेसने नगराध्यक्ष करुन दाखवावे, असे आव्हान भाजप शिवसेना पुरस्कृत वैभववाडी नगरविकास आघाडीच्या पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. नगरविकास आघाडीच्या गटनेत्या सरिता सज्जनराव रावराणे यांच्या निवासस्थानी सायंकाळी पत्रकार परिषद झाली. यावेळी युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र रावराणे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सज्जनराव रावराणे, रणजित तावडे, तसेच नगरसेवक रोहन रावराणे, संतोष माईणकर, संतोष पवार, रवींद्र तांबे, राजन तांबे, रत्नाकर कदम, सरपंच प्रकाश रावराणे, विवेक रावराणे आदी उपस्थित होते. प्रमोद रावराणे म्हणाले, भाजप, शिवसेना व आरपीआय महायुतीने नगरपंचायतीच्या नेतृत्वाची ग्रामविकास आघाडीकडेच दिली जाईल, असा शब्द वाभवेच्या ग्रामस्थांना दिला होता. त्याप्रमाणे आम्ही बिनविरोध निवड जाहीर होताच रवींद्र रावराणे यांना नगराध्यक्ष पदासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु रावराणे यांनी गावाचा विश्वासघात तरीही ते अपक्ष नगराध्यक्ष होणार असल्याचे आम्हाला समाधान आहे. नारायण राणे बोलतात ते करतात हा आमचा आजवरचा अनुभव आहे. परंतु आपल्या मुलाच्याही प्रचाराची सभा न घेता राणे यांनी वैभववाडीत १४ जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र त्यांच्या स्थानिक नेतृत्वाच्या नाकर्तेपणामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, बँकेची सर्व सत्ता वापरूनही आणि आमदार नीतेश राणे यांनी दोन महिने वैभववाडीत ठाण मांडून मतदारांना लक्ष्मीदर्शन घडवूनसुद्धा केवळ सातच जागा काँग्रेसला जिंकता आल्या. त्यामुळे पक्षाचा नगराध्यक्ष बसणार नाही. हे लक्षात आल्यावर आमदार राणे यांनी नामुष्की टाळण्यासाठी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांना डावलून ग्रामविकास आघाडीच्या अपक्ष रविंद्र रावराणे यांना उमेदवारी दिली आहे. आम्ही विरोधासाठी विरोध करणार नाही. मात्र, चुकीचे काहीच होऊ देणार नाही. जयेंद्र रावराणे म्हणाले, रवींद्र रावराणे हे ग्रामविकास आघाडीचे नगरसेवक आहेत. तरीही त्यांनी ग्रामस्थांचा विश्वासघात केल्यामुळेच आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. परंतु काँग्रेसला आमच्या भितीपोटी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांना डावलावे लागले हाच आमचा विजय आहे. आम्ही नगरपंचायती कोणतीच निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. येत्या पाच वर्षात काँग्रेसची अवस्था काय असेल तेही सर्वांना दिसेल. (प्रतिनिधी)कुटनीतीचे पद औटघटकेचे : रावराणेवैभववाडीच्या जनतेने काँग्रेसच्या विरोधात कौल दिला. काँग्रेसची दादागिरी मोडीत काढली. त्यामुळेच आम्ही आमच्या प्रयत्नातून बिनविरोध निवडून आणलेल्या रवींद्र रावराणे यांना नगराध्यक्ष पदासाठी आपल्या जाळ्यात ओढले. काँग्रेसने कुटनीतीचे राजकारण करुन मिळवलेले नगराध्यक्षपद औटघटकेचे ठरणार असून नगराध्यक्ष पद मिळविल्याचा काँग्रेसचा उत्साह फार काळ टिकणार नाही, अतुल रावराणे यांनी स्पष्ट केले.