सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेची विषय समितीची सभापती निवड शुक्रवारी पार पडली. या सभापती निवडीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे उपस्थित होते. यात पाणी पुरवठा सभापतीपदी शर्वरी धारगळकर, आरोग्य, क्रीडा व ज्येष्ठ नागरिक समिती सभापतीपदी देवेंद्र टेमकर तर महिला बालकल्याण समितीची धुरा वैशाली पटेकर यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र, स्थायी व नियोजन ही दोन्ही सभापती पदे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाकडे ठेवण्यात आली आहेत.सावंतवाडी नगरपालिकेची सभापती निवड आज पार पडली. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांसह नगराध्यक्ष बबन साळगावकर उपनगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थीत होते. यावेळी सभापतीपदासाठी नव्यानेच निवडून आलेल्या चेहऱ्यांनाच संधी देण्यात आली. यात पाणी पुरवठा व उद्यान समितीचा कार्यभार शर्वरी धारगळकर यांच्याकडे देण्यात आली आहे. या समितीचे सदस्य म्हणून किर्ती बोंद्रे, शुभांगी सुकी, राजू बेग व विलास जाधव काम पाहणार आहेत.महिला बालकल्याण समिती सभापती म्हणून वैशाली पटेकर यांची निवड करण्यात आली. या समितीचे सदस्य अफरोज राजगुरू, योगिता मिशाळ, अनारोजीन लोबो, क्षिप्रा सावंत हे काम पाहणार असून आरोग्य समिती क्रीडा व नागरिक बालकल्याण समितीचे काम देवेंद्र टेमकर यांच्याकडे देण्यात आले असून सदस्य म्हणून सुधन्वा आरेकर, योगिता मिशाळ, संजय पेडणेकर, साक्षी कुडतरकर आदी काम पाहणार आहेत.दरम्यान, यावेळी नियोजन व जलनिस्सारण पर्यटन पर्यावरण समितीचा कार्यभार उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्याकडेच ठेवण्यात आला आहे. तर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याकडे स्थायी समितीचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)वाडकरांना स्थान नाहीनगरसेवक गोविंद बाळा वाडकर यांना नव्याने नियुक्त झालेल्या समिती सभापतीमध्ये तसेच सदस्यांमध्ये स्थान देण्यात आले नाही. त्यांनी या निवडीकडे ही पाठ फिरवली आहे. दीपक केसरकर हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेल्यापासून वाडकर हे काहीसे नाराज असून पालिकेच्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसत नाहीत.
सावंतवाडी नगरपालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी
By admin | Updated: December 26, 2014 23:59 IST