शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विकासात विरोधकांनी राजकारण करू नये

By admin | Updated: January 9, 2016 23:59 IST

दीपक सावंत : साथीत बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचा प्रयत्न

 सिंधुुदुर्गनगरी : सिंंधुदुर्ग जिल्ह्यात लेप्टोची साथ नियंत्रणात आणण्यात व रुग्णांचे दवाखान्यात जाण्याचे प्रमाण शून्यावर आणण्यात शासनाला यश मिळाले आहे. भविष्यात ही साथ येणार नाही यासाठी यंत्रणा आधीच सज्ज करून ठेवली आहे. विविध आजारांच्या साथीत बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयातील सदस्याला नोकरी देण्याचा देखील प्रयत्न करण्यात येईल, असे सांगून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विरोधकांना निव्वळ राजकारण न करता जिल्ह्याच्या विकासाच्या कामात खीळ घालू नये, असे आवाहनही केले. डॉ. सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा गेल्या १५ वर्षांत खिळखिळी झाली असून मी आरोग्य खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून गेल्या वर्षभरात ही यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी सिंधुदुर्गाचा सुपुत्र आहे, पण माझ्यावर संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्याची जबाबदारी आहे. सिंधुदुर्गात डॉक्टर आणण्याचा आणि तो टिकवण्याचा फॉर्म्युला विरोधकांनी द्यावा. आम्ही तो नक्की अंमलात आणू, असे आवाहन दीपक सावंत यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेबाबत सतत गळा काढणाऱ्यांनी आणि निराधार आरोप करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेत आरोग्यमंत्री सावंत म्हणाले की, विरोधकांच्या हातात वर्षानुवर्षे सत्ता असतानाही ते का गप्प होते? सत्तेची १५ वर्षे ज्यांनी कास धरली होती तेव्हा आतासारखीच सक्षम आरोग्य यंत्रणा होती का? गेल्या १५ वर्षांत सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्था खिळखिळीच झाली आहे. तेव्हा विरोधकांनी का नाही गळे काढले? विरोधकांना गेली १५ वर्षे या जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यास मोेठा वाव होता. परंतु त्यांनी काही केले नाही. माझ्याकडे आरोग्य मंत्रिपद येऊन केवळ एक वर्ष झाले. या कारकिर्दीत सुमारे १३ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. डॉक्टरांना आणण्यात यश मिळत आहे. रुग्णालयांना बळकटी आणण्यासाठी लाखो रुपयांचा निधी दिला. जिल्ह्यातील सुरक्षारक्षकांची संख्या ३० वरून ५१ करण्यात आली. उपकेंद्रे बांधण्यासाठी कोट्यवधीचा निधी दिला. विशेष बाब म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अस्थायी डॉक्टरांची नेमणूक करण्यात परवानगी दिली असून भरती प्रक्रिया सुरू आहे. (प्रतिनिधी)सीपीएस कोर्स मंजुरीसिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालय येथे एम.बी.बी.एस.नंतरचे पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. सीपीएस अभ्यास कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालयात डिप्लोमा इन चाईल्ड हेल्थ, डिप्लोमा इन गायनोकॉलॉजी एन्यु आॅबस्टेटिक्स, डिप्लोमा इन चाईल्ड हेल्थ, डिप्लोमा इन पॅथॉलॉजी एन्ड बॅक्टेरीआॅलॉजी हे वैद्यकीय अभ्यासक्रम मंजूर झाले आहेत.